ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला..

त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, पेठ आणि नाशिक या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

त्र्यंबकेश्वर जलमय..
author img

By

Published : Jul 7, 2019, 12:40 PM IST

नाशिक - जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. या त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, पेठ आणि नाशिक या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुष्काळामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते्. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरीवर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस पडल्यानंतर गोदावरी प्रवाहित होऊन गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये झाला असून 24 तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्ये 135 मिलिमीटर, तर पेठमध्ये 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुरगाणा तालुक्यात 104.3 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. एकूणच नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस,त्र्यंबकेश्वर जलमय..

Body:नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रात्रभर संततधार पाऊस झाला,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि नाशिक या ठिकाणी जोरदार पाऊस झाला,त्र्यंबकेश्वर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत पाणी भरल,जिल्हयात सर्वाधिक पाऊस हा इगतपुरी मध्ये झाला असून 24 तासात 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे,त्यापाठोपाठ त्रंबकेश्वर मध्ये 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पेठ मध्ये 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे ,तर सुरगाणा मध्ये 104.3मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, एकूणच नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केला आहे, मात्र दुसरीकडे त्रंबकेश्वर मध्ये दरवर्षीप्रमाणे नाल्याची सफाई न झाल्याने आणि पाणी निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने बाजार पेठेतील अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी गेल्याने मोठं नुकसान झालं आहे,ह्या मुळे त्रंबकेश्वरकरां सोबत भविकांची चांगलीच तारांबळ उडाली...
टीप ftp
nsk trambkeshwer viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.