ETV Bharat / state

नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, छोट्या नद्यांनीही गाठली धोक्याची पातळी

मुसळधार पावसाच्या पाण्याने गोदावरी नदीला अचानक पूर आला. त्यामुळे नदीकाठी पार्किंगमध्ये लावण्यात आलेले वाहने पाण्यात अडकली आहेत.

गोदावरीला पूर
author img

By

Published : Jul 7, 2019, 2:33 PM IST

नाशिक - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रविवारी पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्‍ह्‍यात पावसाचा जोर वाढला असून, गंगापूर धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच गोदावरी नदीलाही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ९०० मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नाशिक शहरात ३०० मिलिमीटर पाऊस पडला आहे.

मुसळधार पावसाच्या पाण्याने गोदावरी नदीला अचानक पूर आला. त्यामुळे नदीकाठी पार्किंगमध्ये लावण्यात आलेले वाहने पाण्यात अडकली आहेत. वाहनांना बाहेर काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेली वाहने हटवण्याचे काम चालू आहे.

नाशिक शहरात काल शनिवारी दुपारपासून पाऊस सुरू असल्‍याने गोदावरी नदी समवेत अनेक छोट्या नद्यांना पूर आला आहे. यामध्ये वाघाडी, नंदिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच शहरातील सिडको, पंचवटी, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरात पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यालगत उभी असलेली मोठी झाडे ही रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मनपा प्रशासनाकडून पडलली झाडे हटवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.

Intro:अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्‍ह्‍यात पावसाचा जोर वाढला असून, गंगापूर धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच गोदावरी नदीलाही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात 900 मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नाशिक शहरात तीनशे मिलिमीटर पाऊस पडला आहेBody:मुसळधार पावसाच्या पाण्याने गोदावरी नदीला अचानक पूर आल्याने गोदावरी नदीकाठी पार्किंग साठी लावण्यात आलेले वाहने पाण्यात अडकल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेली वाहने हटवण्याचे काम चालू आहेConclusion:दरम्‍यान नाशिक शहरात काल शनिवार दुपारपासून पाऊस सुरू असल्‍याने गोदावरी नंदी समवेत अनेक छोट्या नदीला पूर आला आहे. यामध्ये वाघाडी,नंदिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तसेच शहरातील सिडको, पंचवटी, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरात पावसाचा जोर कायम असून, यामुळे नाशिकमध्ये जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यालगत उभी असलेली मोठी झाडं ही रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मनपा प्रशासनाकडून हि झाडे हटवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.