नाशिक - शहरात गेल्या महिन्याभरापासून गुंडानी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नाशिककरांचा खाकीवरील विश्वास उडालाय असेच म्हणता येईल. मागच्या काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, हत्या यामुळे नाशिक हादरले आहे.
धार्मिक, आध्यत्मिक आणि संस्कृतीचा वारसा असलेले नाशिक हे गुन्हेगारांचे माहेर घर बनू पाहत आहे. मागच्या महिन्या चोऱ्या, हत्या, घरफोड्या दरोडे आणि गोळीबारामुळे नाशिककरांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या शहरातील सीटी सेंटर मॉल जवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरली नाही. अशी भावना नाशिककरांच्या मनात निर्माण झाली आहे. या घटनेला काही तास उलटले नाहीत तेच म्हसरूळ भागात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील चार वाहनांची तोडफोड करत पोलिसांना आव्हान दिले. आठ दिवसांन पूर्वी भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केलं होते. जिथे पोलिसंच सुरक्षित राहू शकत नाही तिथं सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नाशिककर विचारत आहे.
विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्या नंतर नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी भावना नागरिकांमध्ये आहे. यामुळे नांगरे पाटील यांचे नाशिककरांनी जोरदार स्वागत केले. मात्र, काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोक वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करत आहेत. वाढत्या गुन्हेगारी बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे यांनी सांगितले आहे.
हेल्मेट सक्तीवर कारवाईसाठी रस्त्यावर शेकडो पोलीस उतरवण्या पेक्षा गुन्हेगारी कशी कमी होईल या कडे आयुक्तनी लक्ष द्यावे. नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला वाऱ्यावर सोडू नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.