ETV Bharat / state

तब्बल बारा वर्षांनंतर गिरणा धरण शंभर टक्के भरले

तब्बल बारा वर्षांनंतर गिरणा धरण शंभर टक्के भरले असून, धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गिरणा धरण
author img

By

Published : Sep 17, 2019, 11:45 PM IST

नाशिक - उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण व जळगावसह खानदेश परिसरासाठी वरदान ठरलेले गिरणा धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाचे दोन दरवाजे उघण्यात आले आहेत. धरणातून गिरणा नदीपात्रात पंधराशे क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १२ वर्षांनंतर गिरणा धरणाने प्रथमच शंभरी गाठली आहे.

गिरणा धरण

धरणाच्या उगमस्थान असलेल्या कळवण, सुरगाणा व सटाणा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. चनकापूर, पुनद धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर हरणबारी व केळझर ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व मोसम नदीला पाणी सोडण्यात आल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २००७ नंतर प्रथमच हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. एकूण २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेले गिरणा धरण आतापर्यंत फक्त पाचवेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.

गिरणा धरण पूर्ण भरल्याने मालेगाव, नांदगांव, चाळीसगांव, भडगाव, पाचोरा या गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटणार तर जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे गिरणा धरण ज्या नांदगाव तालुक्यात आहे. तो नांदगाव तालुका अद्यापही कोरडाच आहे.

Intro:उतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण व जळगावसह खानदेश परिसरासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरण शंभर टक्के भरले असून , धरणाचे दोन दरवाजे उघण्यात आले असून , धरणातून गिरणा नदीपात्रात पंधराशे क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. १२ वर्षांनंतर गिरणा धरणाने प्रथमच शंभरी गाठली आहे.Body:धरणाच्या उगमस्थान असलेल्या कळवण,सुरगाणा व सटाणा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.चनकापुर ,पुनद धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर हरणबारी व केळझर ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व मोसम नदीला पुर पाणी सोडण्यात आल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली . २००७ नंतर प्रथमच हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. एकूण २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेले गिरणा धरण आतापर्यंत फक्त पाचवेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.Conclusion:गिरणा धरण पूर्ण भरल्याने मालेगाव व् नांदगांवसह चाळीसगांव ,भडगाव,पाचोरा या गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटला तर जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाला प्रश्नही मार्गी लागला आहे . विशेष म्हणजे गिरणा धरण ज्या नांदगाव तालुक्यात आहे. तो नांदगाव तालुका अद्यापही कोरडाच आहे .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.