नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी भविकांनी गणेश मूर्ती विक्री दुकानात गर्दी केली. नाशिक शहरात 2 लाखाहून अधिक बाप्पांची घरोघरी आज विधिवत पूजा करून स्थापना होत आहे.
यंदाच्या वर्षी एक ते दीड फुटा पर्यँतच्या गणेश मूर्ती खरेदीला भाविक पसंती देत आहेत. कोरोनामुळे 40 टक्के कमी प्रमाणात गणेश मूर्ती नाशिकच्या बाजारात असल्याचे गणेश मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले. तसेच जल प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज बहुकेत कुटुंबानी पर्यायवरण पूरक शाडूमाती आणि सीडच्या गणेश मुर्तीला पसंती दिल्याचे दिसून आले.