ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३ : 'बाप्पा'चा थाट; चांदीच्या मूर्ती, अलंकारांना ग्राहकांची मोठी मागणी - Ganpati Bappa In Nashik

Ganeshotsav २०२३ : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा चांदीच्या गणेश मूर्तीसह बाप्पाचे अलंकार, पूजेचे साहित्य आदींना भाविकांची मागणी वाढली आहे. तर गणेशमूर्ती 1500 पासून ते 2 लाखांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.

Ganeshotsav 2023
चांदीच्या गणेश मूर्तीची स्थापना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 10:33 AM IST

घरोघरी गणेश सजावटीची तयार सुरू

नाशिक : Ganeshotsav २०२३ : गणपती बापाचं आगमन 19 सप्टेंबर रोजी (Ganesh Festival) होत आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच घरोघरी गणेश सजावटीची तयार सुरू झाली. यंदा बाजारात अनेक 'इको फ्रेंडली' (Eco Friendly Ganpati) आरास विक्रीची दुकानं थाटली आहेत. अशात सोने-चांदीच्या गणेश मूर्ती, (Silver Ganpati In Nashik) बाप्पाच्या अलंकारांना देखील मागणी वाढली आहे. सराफ बाजारामध्ये पंधराशे रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.

चांदीच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती : दरवर्षी घरोघरी शाडू मातीच्या मूर्तीसह चांदीच्या गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. चांदीच्या या भरीव मूर्ती 20 ग्रॅमपासून ते दोन किलोपर्यंत उपलब्ध आहेत. बाप्पासाठी चांदीचा दुर्वा, मोदक, मूषक, जास्वंदीचं फूल, रत्नजडिक मुकुट, सुंदर हार यांसह सोन्या-चांदीचे दागिने खरेदी (Ganesh Silver Ornaments) करण्यासाठी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. चांदीचे दागिने कायमस्वरूपी होत असल्यानं याला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

चांदीचे परवडणारे दर : जास्वंद फुलांची माळ, दुर्वाची जुडी, मोदक, गणेशाची मूर्ती अगदी अत्यल्प किंमतीत उपलब्ध आहेत. हे दर सजावटीच्या कृत्रिम साहित्यापेक्षा स्वस्त असल्यानं सर्वसामान्य ग्राहकांनाही ते परवडते. यामुळं चांदीच्या या वस्तूंची मागणी दरवर्षी वाढत असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. चांदीमध्ये पूजा साहित्य, मूषक, मोदक यांचं वेगवेगळ्या वजनातील प्रकार उपलब्ध आहेत. तसेच भरीव आणि आकर्षक चांदीच्या गणेश मूर्ती देखील सराफा बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 20 टक्क्यांपर्यंत मागणी वाढली असल्याचं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं.

अलंकार सेट उपलब्ध : खास गणेशोत्सवासाठी अलंकार सेट तयार करण्यात आले आहेत. चांदीमध्ये केवडा हार, जास्वंद, ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, तोरण, त्रिशूळ, समयी, दिवे, ताम्हण, पळी, पंचपात्रं, चौरंग, केळीचे पान, पाठ, विड्याचं पान उपलब्ध आहेत. काही सराफ व्यावसायिकांनी त्याचे सेट तयार केले आहेत. सोन्याच्या अलंकारांनाही काही प्रमाणात मागणी असल्याचं सराफी सांगतात.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav २०२३ : मराठा बटालियन यंदा उत्साहात करणार गणेशोत्सव साजरा; 'श्रीं'च्या प्रतिकात्मक मूर्ती पुण्यातून रवाना
  2. Ganesh Chaturthi 2023: गणरायाला सोन्याचा साज चढवण्यासाठी सजली बाजारपेठ, सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांना वाढली मागणी
  3. Letter To Lalbaugcha Raja : 'बाप्पा, माझं चुकलं. मला माझी नोकरी परत मिळू दे..', भाविकानं लालबागच्या राजाला पत्र लिहून केला गुन्हा कबूल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.