ETV Bharat / state

Nashik Sahitya Sammelan 2021: कुसुमाग्रज नगरीत अवतरले 'गाडगे बाबा'

कुसुमाग्रज नगरीत अखिल भारतीय 94 व्या साहित्य संमेलनाला ( Nashik Sahitya Sammelan 2021 ) धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या नगरीत संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा संदेश देत साफसफाई करत मन शुद्ध ठेवा, असा जागर फुलचंद नागटिळक हे करत आहेत.

Nashik Sahitya Sammelan 2021
फुलचंद नागटिळक
author img

By

Published : Dec 4, 2021, 8:15 PM IST

नाशिक - कुसुमाग्रज नगरीत अखिल भारतीय 94 व्या साहित्य संमेलनाला ( Nashik Sahitya Sammelan 2021 ) धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या नगरीत संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा संदेश देत साफसफाई करत मन शुद्ध ठेवा, असा जागर फुलचंद नागटिळक हे करत आहेत. विशेष म्हणजे ते हा जागर संत गाडगे बाबांच्या वेशात करत असून त्यांच्यासोबत अनेकजण सेल्फी क्लिक करत आहे.

बोलताना फुलचंद नागटिळक

गोपाला गोपाला देवकीनंद गोपाला याचा गजर करत स्वच्छतेचा संदेश...

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी फुलचंद नागटिळक संमेलनात संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करुन आले आहे. 'गोपाला गोपाला देवकीनंद गोपाला', असा गजर करत स्वच्छतेचा संदेश ते देत आहे. ते स्वत: कवी लेखक असून कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे ते प्रेमी आहे. अनेक ठिकाणी त्यांनी एकपात्री नटसम्राट हे नाटक सादर केले आहे. कुसुमाग्रजांची ओढ त्यांना नाशिक नगरीत घेऊन आली. ते या ठिकाणी कचऱ्याबरोबरच तन, मन आणि वाचेचीही शुद्धता ठेवा, असा संदेश देत आहे.

हे ही वाचा - साहित्यीकांनी कोणत्याही राजकीय पक्षांशी 'वफादार' राहू नये - जावेद अख्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.