नाशिक - मोबाईल रिचार्जसाठी मित्राने चारशे रुपये दिले नाही म्हणूण दुसऱ्या मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ( Attacked for Mobile Recharge ) सातपूरच्या श्रमिकनगरातील विश्वकर्मा मंदिरासमोर घडली आहे. ऋतिक देवराम इंगळे, असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. इंगळेने दिलेल्या तक्रारीवरुन उमेश गवारे याच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात ( Satpur Police Station ) गुन्हा दाखल झाला आहे.
मित्राच्याच हल्ल्यात ऋतिक इंगळे गंभीर जखमी
ऋतिक इंगळे व उमेश गवारे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. उमेशने ऋतिककडे मोबाईल रिचार्जसाठी चारशे रुपये मागितले होते. त्यावेळी ऋतिकने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. राग अनावर झाल्याने उमेशने ऋतिकला शिवीगाळ करत चाकूहल्ला केला. ऋतिक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित उमेश चिंतामण गवारे ( रा.श्रमिक नगर, सातपूर) यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मित्राने मोबाइल रिचार्जच्या चारशे रुपयांसाठी चाकू हल्ला केल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Helmet Compulsory In Nashik : दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट सक्ती; "अन्यथा 18 जानेवारीपासून..."