ETV Bharat / state

मनमाडला कोरोनाचा कहर; १६ नवीन रुग्णांची भर, ४ व ६ वर्षीय मुलांचा समावेश - कोरोना नाशिक बातमी

मनमाडच्या दोन दिवसांपूर्वी शंकूतला नगर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्या घरातील जवळपास २८ जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात ४ व ६ वर्षीय लहान मुलांचा समावेश आहे.

मनमाडला कोरोनाचा कहर
मनमाडला कोरोनाचा कहर
author img

By

Published : Jun 3, 2020, 4:39 PM IST

नाशिक - देशासह राज्यभरात कोरोनाचे थैमान सुरुच असून आज(बुधावार) मनमाड शहरात नवीन १५ रुग्णांची भर पडली आहे. एकाच कुटुंबातील तब्बल १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यात ४ व ६ वर्षीय लहान मुलांचा देखील समावेश असून एका पालिका कर्मचाऱ्याचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सध्या मनमाड शहरात कोरोनाबधितांची एकूण संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे.

मनमाड हे जवळपास सव्वा लाख लोकवस्तीचे गाव असुन रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. प्रशासकीय स्तरावर देखील मनमाडला कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव होण्याचा ईशारा देण्यात आला होता. मात्र, तब्बल अडीच महिने एकही रुग्ण नसलेल्या शहारत आज जवळपास २९ जण कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी ११ जण उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर आज दवाखान्यात १८ जण उपचार घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी शंकूतला नगर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्या घरातील जवळपास २८ जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात ४ व ६ वर्षीय लहान मुलांचा समावेश आहे. तर पालिकेच्या रुग्णाचे स्वॅब घेण्यात आले असता त्यात एक पालिका कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून अनेक ठिकाणी बॅरेकटिंग करण्यासह औषध फवारणी करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यासाठी रात्रंदिवस कर्मचाऱ्यांच्या गाड्या फिरत असून नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो.

सध्या शहरातील कोरोनाबधितांची संख्या २९ असून त्यापैकी ११ जण उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, आजघडीला १८ जण उपचार घेत आहेत. अनेक ठिकाणी परिसर सील करून येण्या- जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. औषध फवारणीही सुरू आहे. नागरिकांना वेळोवेळी आवाहन करत असून काही जण प्रतिसाद देतात तर काही जण गंभीरपणे घेत नाहीत. तर, काही हलगर्जीपणा करत आहेत अशांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी दिलीप मेणकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.