ETV Bharat / state

नाशिक : दिंडोरी तालुक्यात विजेच्या धक्का लागल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू - nashik latest news

दिंडोरी तालुक्यात विजेच्या धक्का लागल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नारायण लहानू जाधव (68), असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

nashik farmer died news
नाशिक : दिंडोरी तालुक्यात विजेच्या धक्का लागल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 6, 2021, 10:21 PM IST

दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात विजेच्या धक्का लागल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नारायण लहानू जाधव (68), असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. नारायण जाधव खचवड येथील रहिवासी होते.

वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू -

नारायण लहानू जाधव हे सकाळी गावातील खंडेराव मंदिरात देवदर्शनाला गेले असता मंदिरासमोर असलेल्या विद्युत खांबावरील लोखंडी स्टेला हात लागला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटानस्थळाचा पंचनामा केला. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सुकदेव खुर्दळ यांनी गावातील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याची मागणी संबधित विभागाकडे केली आहे.

हेही वाचा - 'अंकल जी, राजभवनातल्या सोयऱ्या-धायऱ्यांसह दिल्लीला परत जा'; महुआ मोइत्रांची राज्यपालांवर खोचक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.