ETV Bharat / state

Fake Military officer Nashik : तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक, अनेक मुलांची केली फसवणूक - Fake Military officer Nashik

नाशिकमध्ये तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक ( Fake Military officers Arrest In Nashik ) करण्यात आली आहे. गणेश पवार असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक बेरोजगार मूलांना लष्करी भरतीचे आश्वासन देत फसवणूक केली आहे.

तोतया अधिकारी गणेश वाळू पवार
तोतया अधिकारी गणेश वाळू पवार
author img

By

Published : Dec 30, 2021, 5:37 PM IST

नाशिक : नाशिक मधील आर्टलरी ट्रेनिंग सेंटर परिसरात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून फिरणाऱ्या एका तोतयाला लष्करी इंटेलिजन्स विभागाने अटक ( Fake Military officers Arrest In Nashik ) केली आहे. जवानांच्या नातलगांसाठी सुरू असलेल्या भरतीमध्ये तो मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश व त्यावर खोटा बॅच लावून वावरत होता. त्याच्याकडे लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रातील छायाचित्र व व्हिडिओ आढळून आल्याने, हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गणेश वाळू पवार ( रा. चांदवड, हरसूल) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. गणेशने लष्करात भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांकडून 3 ते 15 लाख रुपये उकळ्याची माहिती समोर आली आहे. या पैशातून नाशिक येथे एक फ्लॅट सह आलिशान गाडी खरेदी गणेशने केली आहे. त्याच्या खाजगी वाहनांवर लष्करी पदवीचा लोगो लावून तो सर्वत्र वावरत होता

कानाखाली काढताच...

गणेश पवार आणि त्याचा ड्रायव्हर कॅम्प परिसरात भरतीसाठी आलेल्या मुलांकडून कागदपत्रे जमा करत होते. तेव्हाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता युनिट ओळखपत्र, बॅच यााबाबत माहिती दिली नाही. तेव्हा तो तोतया असल्याचे स्पष्ट होताच वर्दी उतरून संतप्त लष्करी जवानाने त्याच्या कानाखाली आवाज काढला.

कुटुंबाला ठेवल अंधारात

गणेश पवार याने आपली बायको आणि वडिलांना अंधारात ठेवल होते. वडिलांना मुलगा लष्करात लेफ्टनंट कर्नल झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सेवानिवृत्त लष्करी जवान असणाऱ्या वाळू पवार यांनी भव्य सत्कार समारंभ करत गाव जेवण दिले होते. तसेच, प्रत्यक्षात कला पदवी घेतलेल्या गणेशने 2017 च्या बॅचमध्ये लेफ्टनंट असल्याचे भासवत सटाणा येथील गीतांजली सोबत गत वर्षी जानेवारीमध्ये विवाह केला आहे.

खोट्या कागदत्रांचा वापर करुन कर्ज; भरतीच्या नावाखाली....

गणेशच्या मोबाईलमध्ये बनावट शिक्का वापरून बनवलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट, सर्व्हिस सर्टिफिकेट आढळून आले आहे. याचा वापर करुन त्याने चांदवड मधील एका बॅंकेकडून 39 लाखांचे कर्ज घेतले. तसेच, बेरोजगार मुलांना देवळाली कॅम्प आणि आर्टलरी सेंटर नाशिक येथे गट क मध्ये नोकरीचे आमीष दाखवले. त्यांच्याकडून 3 लाख ते पंधरा 15 लाख रुपये उकळून फसवणूक केली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut in Nashik :'...म्हणूनच अजितदादा आणि बाकी आमदार संध्याकाळपर्यंत परत आले'; संजय राऊतांनी उलगडे रहस्य!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.