नाशिक : नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे (Nashik Cyber Crime) घडत आहे. त्यातच नाशिक महापालिका (Nashik Municipal Commissioner) आयुक्तपदी नव्याने नियुक्त झालेले, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने बोगस पद्धतीने पैसे उकळण्याचा (Fake account in the name of Municipal Commissioner) प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान याबाबत आयुक्तांनी हा सर्व प्रकार चुकीचा असून याबाबत पोलीस आयुक्तांकडे (Complaint to Police Commissioner in Nashik) तक्रार केली असल्याचे, सांगितले आहे.
फेक मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन : मनपा आयुक्तांच्या नावाने व्हाट्सअप वर एक फेक मेसेज फिरत आहे. या मेसेजच्या माध्यमातून रक्कम उकळण्याचा डाव सुरू झाल्याचे लक्षात आले. आयुक्तांच्या नावाने बोगस खाते उघडून एका भामट्याने हा प्रकार सुरू करून महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्याबाबतची लिंक पाठवली असल्याने, हा प्रकार उघडकीस आला. याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता; त्यांनी सांगितले की, 'हा सर्व गैरप्रकार आहे. याबाबत आपण पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर या लिंक वर कोणीही क्लिक करू नये असे' आवाहन त्यांनी केले.
विशेष म्हणजे या लिंक मध्ये आयुक्तांचा फोटो व्हाट्सअप डीपी वर वापरण्यात आला असल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. व्हाट्सअप डीपीला मनपा आयुक्त पुलकुंडवार यांचा फोटो ठेवून स्वतः आयुक्त असल्याचे भासविण्यात येत आहे. तसेच नागरिकांना लिंक पाठवत लिंक क्लिक करून पैसे पाठविण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. चक्क मनपा आयुक्तांच्या नावाने नागरिकांची फसवणूक करून पैसे उकळणारा आहे तरी कोण? असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे. व्हाट्सअप वर अनोळखी लिंक डाउनलोड किंवा ओपन केल्यास आपण पुन्हा नव्या लिंककडे जात असतो. लिंक क्लिक करून पैसे पाठविण्याच्या सूचना करत असतांनाच, यातून गुन्हेगाराकडे तुमच्या ऑनलाईन व्यवहाराची सर्व माहिती आणि इतर अपडेट पोहचते. मग टोळी त्वरित तुमच्या बँकेवर डल्ला मारून बँक खाते रिकामे करते. या प्रकारानंतर मनपा आयुक्तांकडून नाशिक शहरातील नागरिकांना फेक मेसेजला बळी न, पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.