नाशिक - सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली आहे. अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाही. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा - नाशिकमध्ये शहरातील टवाळखोरांना निर्भया पथकाचा दंडुका
मिळालेल्या माहितीनुसार, नाईस परिसरात ललित हायड्रॉलिक्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत संध्याकाळी अचानक डेपोत स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीतून आगीचे लोळ बाहेर येत होते. महापालिकेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीत 6 कामगार भाजले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, तसेच जखमी कामगारांबाबतही अद्याप माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा - नाशिक : 20 रुपये दिले नाहीत म्हणून गळ्यावर कटरने वार करत मजुराचा खून