नाशिक - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत अडथळा निर्माण करणारे झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे. उंटवाडी परिसर संभाजी चौकातील झाडे तोडली गेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी नसताना देखील केवळ स्थायी समितीच्या ठरावाचा आधार घेत वृक्षतोड केली आहे. मनसेने त्यांच्या वेगळ्या शैलीत आंदोलन केल्याचेही यावेळी पाहायला मिळाले
हेही वाचा - पेट्रोल-डिझेल भडकण्यास सुरुवात; जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका
नाशिकमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी करण्यात आलेल्या फलकबाजी विरोधात मनसेने अभिनव पद्धतीने आंदोलन केले. यात त्यांनी स्वागत फलकाचीच आरती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही नाशिकमध्ये होणाऱ्या महाजनादेशयात्रेच्या समारोपासाठी शहरात प्रचंड फलकबाजी करण्यात आली. याचाच निषेध म्हणून मनसेने आंदोलन केले.
शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी पोस्टरबाजी केली आहे. पुण्यात पोस्टरबाजी केल्यानंतर मुखमत्र्यांनी पोस्टारबाजी करू नये. असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. नाशिकमध्ये मात्र मुखमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. पाथर्डी फाट्यापासून सुरु होणाऱ्या महाजानदेश यात्रेला झाडांचा कुठलाही अडथळा नसताना देखील वृक्षतोड करण्यात येत आहे. असा आरोप मनसेने यावेळी केला आहे.
हेही वाचा - मी पस्तावतोय... राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज