नाशिक - दिंडोरी येथील डॉ. सुनिल वामनराव पवार (वय 52 वर्षे) यांनी त्यांच्या दवाखान्याच्या वरील खोलीमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
त्यांच्या मुलाला नाशिकरोड रेल्वे स्थानकात सोडून ते दिंडोरीला आले. त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या पत्नीने दिंडोरीत विचारपूस केली असता दवाखाना बंद असल्याचे समजले त्यानंतर त्या दिंडोरीत आल्या. शोधाशोध केली असता दवाखान्याच्यावरील खोलीत ते आढळले. त्यांना दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा - #CAA Protest : नाशिकमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा
याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डी.एम. आव्हाड करीत आहे. डॉ. पवार यांच्या मुलीची पुणे येथे परिक्षा असल्याने तिला त्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. तिला घेण्यासाठी नातेवाईक पुणे येथे गेले होते. रात्री उशिरा त्यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे
हेही वाचा - बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या