नाशिक - दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर काल (17 एप्रिल) विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व सर्व खातेप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत अवैद्य दारू विक्रीवर चर्चा झाली होती.
यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांनी परिसरातील माहिती घेण्यास सुरुवात केली. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पालखेड बंधारा येथे राहणारा शशिकांत गजानन सोनवणे हा अवैधरित्या चोरट्या रीतीने देशी दारुची विक्री करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक आनंद तारगे यांना बातमी मिळाली.
यानंतर पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, कल्पेश कुमार चव्हाण, पोलीस हवालदार अरुण बैरागी, दांडेकर, एस के जाधव पोलीस शिपाई महेश कुमावत व महिला पोलीस शिपाई चव्हाण यांनी स्वत: त्या ठिकणी जाऊन खात्री केली. तेथे पाच खाकी रंगाच्या बॉक्समध्ये 223 देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. या दारूची किंमत 11,596 रुपये आहे. तो मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
अवैध चोरून दारूविक्री, कोरोना विषाणू रोग संदर्भात कलम नुसार शशिकांत सोनवणे याच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.