ETV Bharat / state

धनंजय निकम मालेगांवचे नवे अप्पर जिल्हाधिकारी ... - Dhananjay Nikam appointed as upper collector of Malegaon

कोरोनाचा फैलाव रोखण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार येथे कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी असलेल्या धनंजय निकम यांना पदोन्नती देऊन त्यांची मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे..

Dhananjay Nikam
धनंजय निकम
author img

By

Published : Apr 17, 2020, 4:10 PM IST

मालेगाव ( नाशिक ) - मालेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनामुळे येथील परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत मालेगावमध्ये सक्षम अधिकाऱ्याची गरज होती. त्यामुळे नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या धनंजय निकम यांची मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. काल (दि. १६) रोजी नंदुरबार येथील कार्यालयास आदेश प्राप्त झाले. अपर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार धनंजय निकम उद्या (दि. १८) स्वीकारण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे रुग्णची संख्या मालेगावमध्ये वेगाने वाढत असून रुग्ण संख्या पन्नाशी नजीक पोहोचली आहे. मालेगाव शहर हे दाट लोकवस्ती असलेले असून अनेक लहान सहान गल्लीबोळ आहेत. इथे झोपडपट्टीदेखील मोठी आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी याठिकाणी सक्षम अधिकारयाची गरज होती. थोड्याच दिवसांपूर्वी कळवणचे प्रांत डॉ. पंकज आशिया यांना घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नवी जबाबदारी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.