ETV Bharat / state

MNS Hanuman Chalisa Case : नाशिक मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर पुन्हा तडीपार; जिल्हाध्यक्ष अंकुश पवारांना अटक

author img

By

Published : May 9, 2022, 4:45 PM IST

Updated : May 9, 2022, 5:39 PM IST

मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर ( MNS city president Dilip Datir ) यांना सहायक पाेलीस आयुक्तांनी दहा दिवसांसाठी तडीपार केले आहे. त्याबाबतची नाेटीस त्यांना देण्यात आली आहे. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार ( District President Ankush Pawar ) यांना भद्रकाली पोलिसांनी त्र्यंबकेश्वर ( Bhadrakali Police Trimbakeshwar ) येथे अटक केली आहे.

अंकुश पवारांना अटक
अंकुश पवारांना अटक

नाशिक - हनुमान चालीसा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फरार हाेऊन अटकेनंतर जामीन मिळालेल्या मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर ( MNS city president Dilip Datir ) यांना सहायक पाेलीस आयुक्तांनी दहा दिवसांसाठी तडीपार केले आहे. त्याबाबतची नाेटीस त्यांना देण्यात आली आहे. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार ( District President Ankush Pawar ) यांना भद्रकाली पोलिसांनी त्र्यंबकेश्वर ( Bhadrakali Police Trimbakeshwar ) येथे अटक केली आहे. हनुमान चालीसा प्रकरणावरुन राज्यभर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली आहे. मात्र जामीन मिळाल्या पोलीस पुन्हा कारवाई कशी करु शकते, असा सवाल मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया देताना मनसेचे दिलीप दातीर आणि पोलीस अधिकारी

'कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार' : सातपूर पाेलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दातीर फरार हाेते. मात्र पाेलिसांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर सातपूर पोलिसांनी पुन्हा दिलीप दातीर यांच्यावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहायक आयुक्तांकडे अहवाल पाठविला. त्यानुसार दातीर यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर दिलीप दातीर यांनी नाराजी व्यक्त केली असून जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तडीपारीची कारवाई का? असा प्रश्न दिलीप दातीर यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भोंग्या विरोधातील आंदोलनानंतर अंकुश पवार हे फरार होते. चार दिवसांनतर पवार यांना त्र्यंबकेश्वर येथून आज ( सोमवारी ) अटक केली आहे. पवार यांच्याबरोबर अजून दोन मनसे पदाधिकारी विजय ठाकरे, किरण क्षिरसागर यांना पोलिसांनी भोंगा आंदोलन प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - Raut Vs Somaiya : सोमैयांच्या पत्नीची संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार; 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' केली मागणी

Last Updated : May 9, 2022, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.