नाशिक Dada Bhuse On Lalit Patil Case: मंत्री दादा भुसे आणि त्यांचा मुलगा मालेगाव ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या संपर्कात होता. तसेच दादा भुसे यांच्यासह अनेक आमदारांना तो महिन्याला 16 लाख रुपये हप्ता देत होता असा आरोप काल नाशिकमध्ये खासदार संजय राऊत यांनी केला होता. यानंतर नाशिकचे भाजपा आमदार आक्रमक झाले असून त्यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. अशात दादा भुसे यांनी देखील राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ललित पाटीलने शिवसेनेत प्रवेश केला, असा आरोप दादा भुसे यांनी केला आहे. ड्रग्ज या विषयात कोणाचे समर्थन असण्याचे कारण नाही, त्याची खोलात जाऊन चौकशी झालीच पाहिजे असंही भुसे म्हणाले.
काय म्हटले होते राऊत? नाशिक तीर्थक्षेत्र आहे; मात्र आता नाशिकमध्ये गल्ली गल्लीत पान टपरीवर ड्रग्ज पोहचले असेल तर आम्हाला आवाज उठवावा लागेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ड्रग्ज रॅकेटचे मालेगाव, नांदगाव पर्यंत संबंध आहेत. एका आमदाराला 16 लाख हप्ता मिळत होता. हप्त्याची आकडेवारी मला पोलिसांच्या सूत्रांनी दिली असा आरोप खासदार राऊत यांनी केला. ही लढाई फक्त नाशिकची नाही तर महाराष्ट्राची आहे. हा विराट मोर्चा पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले पाहिजे होते. या ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांना हप्ते मिळत होते. आमदारांना किती हप्ते जात होते हे आता पोलीस रेकॉर्डवर आले आहे.
मालेगावातील ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशिर्वाद? शिक्षण अधिकाऱ्यांनी काल पत्रक काढले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभागी होऊ नये. मग त्यांना पण हप्ते मिळत होते का? कोयता गँगची सूत्रं नांदगाव पर्यंत गेली आहेत. मालेगाव मधून ड्रग्जचे हे रॅकेट कोण चालवत आहे हे गृहमंत्र्यांनी सांगावं. सरकार पाडण्यासाठी किती खोके मिळाले होते हे पालकमंत्र्यांनी सांगावं, असं खासदार राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत मनोरुग्ण झालेत: ड्रग्ज माफिया ललित पाटील हा शिवसेनेचा होता. त्यामुळे ललित पाटीलकडून संजय राऊत यांना हप्ते जात होते का? उद्धव ठाकरेंच्या सेनेला हप्ते जात होते का? असा प्रश्न मंत्री दादा भुसे यांनी विचारला आहे. संजय राऊत एक तर तुम्ही मनोरुग्न झालेला आहात. म्हणून सकाळी उठून अशी वक्तव्य करतात आणि दुसरं तुम्हीच कदाचित ड्रग्स घेता आहात का? असं आम्हाला वाटायला लागलं आहे. या प्रकरणांमध्ये तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं दिसतंय. त्यासाठी तुम्ही असे बेताल झालेले आहात. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करत आहे. या रॅकेटमध्ये अडकलेल्या प्रत्येक माणसाला जेरबंद करणार असल्याचं भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलं.
हेही वाचा:
- Uddhav Thackeray : त्यावेळी दाऊद भाजपाध्यक्ष होता का? ललित पाटील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सरप्राईज देतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा, पवारांसोबत चर्चा
- Nitesh Rane : दसरा झाल्यावर अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट