नाशिक - शहरात गेल्या ८ दिवसात २५० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. जुन्या नाशिक भागात प्रमुख्याने रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या भागात संयुक्तिक जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरात मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी भेट दिल्या. त्यानंतर या भागात नव्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेली नवीन नियमावलीचा विचार आता केला जाणार आहे. त्यासोबतच प्रतिबंधित क्षेत्र ठरवताना अर्थचक्र कसे सुरू राहील याचा देखील विचार करण्याची जबाबदारी आता दोन्ही आयुक्तांनी घेतली आहे.
नाशिक शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जुन्या नाशकात आता नवीन पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे याच ठिकाणी पोलिसांना कोरोनाची लागण होणार नाही म्हणून, मालेगावच्या पार्श्वभूमीवर विशेषता खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीतच नाशिक शहरातील रुग्णांचा वाढता आलेख कसा कमी करायचा यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. सोबतच नाशिक शहरात सम-विषम सुत्राला नागरिकांनी सहकार्य करावे आणि गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी आयुक्त नांगरे-पाटील यांनी केले आहे.
दुसरीकडे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहरात अर्थचक्र सुरू राहून रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध स्तरावर यंत्रणा काम करत असून लवकरच यावर नियंत्रण मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे