नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आज (शनिवार) सकाळी आलेल्या अहवालानुसार 19, तर दुपारच्या अहवालात 3 नविन रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नव्हती. पण आज शहरात नव्याने 6 कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये 18 रुग्ण वाढले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे.
नाशिक शहरातून वाढलेल्या रुग्णांमध्ये देवळाली, मालपाणी, सॅफ्रॉन, सातपूर कॉलनी, हिरावाडी सिडको, उत्तम नगर आणि पाथर्डी फाटा येथील रुग्णांचा समावेश आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये येवला, सिन्नर, मालेगाव आणि मनमाड येथील रुग्ण आहेत.
आजची वाढलेल्या आकडेवारीनंतर, नाशिक जिह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 319 वर पोहोचला आहे. यातील तब्बल 284 रुग्ण हे एका मालेगावमध्ये आहेत. तर मालेगाव वगळता नाशिक शहरात 16 तर नाशिक ग्रामीण मधील इतर गावात 17 रुग्ण आहेत.
हेही वाचा - विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसाला संसर्ग
हेही वाचा - येवल्यात नर्सला कोरोनाची बाधा; शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ वर