नाशिक - शहरात कोरोनामुळे 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील हा कोरोनाचा 43 वा बळी आहे. 19 मे रोजी अंबड लिंक रोड भागातील 73 वर्षीय वृद्ध मधुमेह आणि हृदयविकाराच्या उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना दम लगत असल्याने त्यांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांनी उपचार केले. मात्र, रुग्णाने उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांचा काही तासांतच मृत्यू झाला. यानंतर गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 859 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 43 जणांचा मृत्यू झाला असून 601 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 215 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत,