दिंडोरी ( नाशिक ) - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मागील अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका अनेक व्यवसायांसह आठवडया बाजारात बसणाऱ्या मसाला विक्रेत्यांनाही बसला आहे. कोरोनाच्या भितीने ग्राहक बाजाराकडे पाठ फिरवत असल्याने, मसाला विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ झाली आहे. सद्य घडीला कोणत्याही धंदा केला तरी त्यात झालेला खर्च निघत नसल्याचे भाजी विक्रेते व मसाला विक्रेते यांनी सांगितलं.
दिंडोरी तालुक्यात आठवडयातून सहा गावामध्ये आठवडा बाजार भरतो. त्यात रविवार दिंडोरी, सोमवार खेडगाव, मंगळवार वणी, बुधवार कोशिंबे, गुरुवार वरखेडा, घाग, बारी, शुक्रवार लखमापू व शनिवार भनवड या मोठ्या गावामध्ये बाजार मोठया प्रमाणात भरत असतो. पण सद्या कोरोनाच्या भितीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विक्रेत्यांचा माल विक्री अभावी पडून आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरूवातीला जिल्हा प्रशासनाने बाजार भरवण्यासाठी परवानगी दिली नव्हती. पण काही दिवसांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली. तेव्हा एक दिवसाआड आठवडे बाजार भरायला लागले आहेत. पण या बाजाराकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून फक्त दिवसभरात वीस रुपयाचा मसाला विक्री झाल्याचे, विक्रेते सुनिल अहेर यांनी सांगितले.
हेही वाचा - विना परवाना प्रवास अन् कोरोना फैलावास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल
हेही वाचा - मालेगावच्या जीवनचक्राची चाके पुन्हा सुरू, यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी