नाशिक: काँग्रेसला सात वर्षापासून अद्याप कायमस्वरूपी शहराध्यक्ष पदाचा उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचीच प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. किमान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पूर्ण वेळ आणि सक्रिय कार्यकर्त्यांची निवड होण्याची अपेक्षा असताना पुन्हा प्रभारी नेमल्यांना इच्छुक निष्ठवांतांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहराध्यपदाचा कारभार प्रभारी म्हणूनच: गेल्या सात वर्षापासून काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रभारी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्याकडे होता. पक्षात एक पद, एक व्यक्ती अशी घोषणा केंद्रीय नेतृत्वाने दिल्याने राज्यभरातील शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांचे राजीनामे घेत नवीन नियुक्त्या करण्यात आल्यात. मात्र त्याला नाशिक शहर व जिल्हा अपवाद ठरले, इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीचे आश्वासनही देण्यात आले. परंतु गट बाजीमुळे पक्षश्रेष्ठी नाही शहराध्यक्षपदी पूर्ण वेळ पदाधिकारी नियुक्तीत अडचणी येत होत्या गेल्या. त्यामुळे पुन्हा एकदा प्रभारी शहराध्यक्ष म्हणून आकाश छाजेड यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कॉंग्रेस नेत्यांचा हिरमोड : या पदासाठी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शाहू खैरे, माजी नगरसेवक गुरमीत बग्गा, प्रदेश प्रवक्ता डॉ हेमलाता पाटील,भारत टाकेकर, राहूल दिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी इच्छुक होते.परंतु त्यांचा हिरमोड झाला आहे. गेल्या सात वर्षापासून काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रभारी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष शरद अहिर यांच्याकडे होता.
गटबाजीचा फटका : नाशिक महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाला पूर्ण वेळ शहराध्यक्षपदी संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणाऱ्या चेहऱ्याचा शोध पक्षाच्या प्रदेश पातळीवरून घेतला जात होता. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे माजी नगरसेवक गुरमीत बग्गा यांची शहराध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक पदाचा कार्यकाळ चार महिन्याचा शिल्लक असतानाच बग्गा यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लागलीच चार दिवसातच बग्गा यांची शहराध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा होणार आहे. तेच पुन्हा गटबाजी उफळून आली. त्यामुळे त्यांची ही नियुक्ती रखडली आता छाजेड यांची नियुक्ती झाल्याने इच्छुक बग्गा गटासह खैरे, टाकेकर यांचाही हिरमोड झाला आहे.