नाशिक - येवल्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाची सध्याची स्थिती -
येवल्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या 4372 पोहचली असून आता पर्यंत 177 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावर 3866 जणांनी मात करत घरवापसी केली असून उर्वरित 339 जण कोरोणा उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागात होम क्वारंटाइन नागरिक बिनधास्त फिरतात -
गावात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन राहण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, तरीदेखील नागरिक नागरिक क्वारंटाइन न राहता बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचे चित्र येवल्यातील ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.
क्वारंटाइन सेंटरमधील नागरिक बाहेर फिरत नाहीत -
जे नागरिक क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत ते बाहेर फिरत नसले तरी देखील ग्रामीण भागात होम क्वारंटाइन नागरिक फिरत आहेत. ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून रुग्ण संख्येला आळा बसेल.
लसीकरणाची स्थिती -
येवला उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी पहाटेपासूनच नागरिक अनेक तास रांगेत उभे राहतात. रागेत उभे राहुनही लस मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत असल्याचे चित्र येवला शहरासह ग्रामीण भागात बघण्यास मिळत आहे. 100 लस उपलब्ध असली तर 300 ते 400 नागरिक गर्दी करत आल्याचे चित्र तालुक्यात बघण्यास मिळत आहे. एकंदरीतच लसीचा तुटवडा भासत आहे.
रुग्णाची वाढ -
मागील महिन्याच्या तुलनेने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही वाढ शहरी पेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे.
दिनांक | शहर | ग्रामीण | एकूण |
2 मे | 15 | 21 | 36 |
3 मे | 06 | 64 | 70 |
4 मे | 00 | 44 | 44 |
5 मे | 10 | 87 | 97 |
ही गावे कोरोना हॉटस्पॉट -
लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होत असल्याने रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात मुखेड, पाटोदा, सायगाव, सत्यगाव, नगरसुल, ममदापूर, गुजरखेडे ही गावे कोरोणा रुग्णांची हॉटस्पॉट ठरत आहे. ग्रामीण भागातील सुमारे 300पेक्षा जास्त रुग्ण कोरोणा वर सध्या उपचार घेत आहेत.