येवला ( नाशिक ) - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई झालेली नाही. यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी नालेसफाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. गतवर्षी शहरातील अनेक ठिकाणी नाल्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. हे पाणी सखल भागात साचल्याने सखल भागातील दुकाने, घरांमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
येवला शहरातील अमरधाम, शनी पटांगण, हुडको कॉलनी येथून जाणारा नाल्याची पावसाळा तोंडावर आला असूनही साफसफाई झाली नाही. यामळे नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नाल्याच्या परिसरात राहणारे नागरिक करत आहेत. मागील वर्षी नाले सफाई झाली नव्हती. यामुळे पावसाचे पाणी सखल भागात साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. यामुळे पाऊस सुरू होण्याच्यापूर्वी नाले सफाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - Accident Video : कार व कांद्याने भरलेल्या टेम्पोत धडक; नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कांदाच कांदा