ETV Bharat / state

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : समाजासाठी जीव जाणार असेल तर... ; मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 4:41 PM IST

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : आंतरवाली सराटीतील सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. ते माझ्या नादी लागले तर काही खरं नसून, मग मी त्यांना सोडणार नाही, असं आव्हानच जरांगे पाटील यांनी दिलं होतं. (Chhagan Bhujbal Nashik PC) त्यांच्या टीकेला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे. समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या, असंही भुजबळ यांनी म्हटलं. नाशिकला ते पत्रकारांशी बोलत होते. (Maratha Reservation Issue)

Chhagan Bhujbal On Jarange Patil
छगन भुजबळ
मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

नाशिक Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : आंतरवाली सराटीतील सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला. मी अजित पवार यांना आवाहन करतो की, छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या टीकेला आता छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाल्लं आहे, हे त्यांनी सांगावं. राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या, असंही भुजबळ म्हणाले.

मी धमक्यांना घाबरत नाही : मला धमकीचे फोन आणि मॅसेज येत आहेत. एकदा नाहीतर अनेकवेळा येत आहेत. जिवंत राहणार नाही, तुझी वाट लावू आणि शिव्याही देत आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस काय ते बघतील, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मला शिवसेनेनं मोठं केलं : शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. 35 वर्षे झाले मी ओबीसींच्या हक्कासाठी लढत आहो. काही जण मराठ्यांनी मला मोठं केलं असं सांगून शिव्या देतात; पण मला मोठ केलं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलंय. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली असेल, असंही भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील कुणाचं खातायेत : समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच. मी एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही. मी ओबीसीसाठी काम करत आहे. जानकर यांनी मला समर्थन दिलं मी त्यांचा आभारी आहो. सध्या तरी 'ओबीसी बचाव' हे एकच आमचं काम आहे. राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहे. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाल्लं हे त्यांनी सांगावं आणि आता ते कुणाचं खाताहेत हे त्यांनी सांगावं, असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला.

हेही वाचा:

  1. Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले...', मनोज जरांगेंची सदावर्तेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीका
  2. Maratha Reservation Row : मराठा आरक्षण; पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी, नाहीतर. . . मनोज जरांगेंनी दिला इशारा
  3. Congress On Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचं स्पष्ट; काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.