ETV Bharat / state

ऑनलाइन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्या - पालकमंत्री छगन भुजबळ

author img

By

Published : Sep 17, 2020, 7:41 PM IST

कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्येही या आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक शिक्षकाने ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मुखपट्टीचा वापर, वांरवार हात सॅनिटाईस करण्याबाबतची जनजागृती करावी, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ऑनलाइन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोबाईल टॉवर जोडणीच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Chhagan Bhujbal
पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, कोरोना काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणप्रणाली सुरु करण्यात आली. ग्रामीण भागात व आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात घेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल टॉवरच्या जोडणीच्या कामाला प्राधान्य द्यावे. तसेच जिल्हा परिषद शाळांबरोबरच खाजगी शाळेतही सुरु असलेल्या ज्ञान दानाचा कामाचा आढावा शिक्षण विभागाने वेळोवेळी घ्यावा. याबरोबरच आंतरजिल्हा बदली होवून गेलेल्या शिक्षकांच्या जागेवर नव्याने आलेल्या शिक्षकांना तत्काळ रुजू करुन घेण्याबाबतच्या सूचना भुजबळांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती तसेच अतिरिक्त वर्ग खोलीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या वर्ग खोल्यांचे नुकसान झाले आहे त्याकडेही लक्ष देवून दुरुस्त्या करुन घेण्याबाबतचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना ‍ भुजबळ यांनी दिले. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतांनाही जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना शिक्षण पोहचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये तंत्रसेतू ॲप, व्हाटसॲप, ऑनलाइन झुम, जिओ मीट, गुगल क्लासरुम इत्यादी वापरण्यात आलेली ऑनलाइन माध्यमांचा प्रभावी वापर केला. परंतु त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण देता येवू शकत नाही. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन ओट्यावरच्या शाळा, गल्ली मित्र, गृहभेटी सारखे स्तुत्य उपक्रम राबविल्याचे सांगून भुजबळानी शिक्षण विभागाचे कौतुकही केले आहे. कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्येही या आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक शिक्षकाने ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मुखपट्टीचा वापर, वांरवार हात सॅनिटाईस करण्याबाबतची जनजागृती करावी, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे.

15व्या वित्त आयोग निधीमधून शाळा दुरुस्तीचे नियोजन - लीना बनसोड

जिल्हा परिषदेची 327 अतिरिक्त वर्ग खोलींची मागणी असून 1 हजार 765 शाळेंच्या वर्ग खोलींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्त्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधून करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये इमारतींचे काम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय व विद्युतीकरणाची कामे करण्यात येणार असल्याचे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.