नाशिक - छगन भुजबळ यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत येवला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते यंदा चौथ्यांदा या मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
भुजबळ हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून, त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भुजबळांच्या येवला येथील संपर्क कार्यालयापासून काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले होते. ढोल-ताशा आणि भुजबळांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसरात दुमदुमून गेला होता. छगन भुजबळ हे मागील 15 वर्षांपासून येवला मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.
हेही वाचा एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागत - छगन भुजबळ
यंदा देखील केलेल्या विकासाच्या जोरावर मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा छगन भुजबळांसमोर शिवसेनेचे उमेदवार संभाजी पावर यांचे आव्हान असणार आहे.