ETV Bharat / state

पुतण्याच्या प्रचारासाठी छगन भुजबळ नाशिकमध्ये तळ ठोकून

छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक भेटीवर जोर दिला आहे. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या छोटेखाणी बैठका घेण्यात येत आहेत.

छगन भुजबळ
author img

By

Published : Mar 23, 2019, 8:07 PM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. समीर भुजबळ यांनी गेल्या २ महिन्यांपासून निवडणुकीसाठी मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. भुजबळ कुटुंबांतील सर्वांनीच प्रचारात स्वतःला झोकून दिल्याचे दिसत आहे.

नाशिक - प्रचारासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करताना छगन भुजबळ

छगन भुजबळ हेआघाडीच्या काळात नाशिकची झालेली विकास कामे मतदारांसमोर मांडत आहेत. मागील ५ वर्षांत भाजप सरकारने दिलेली अश्वासने कशी चुकीची ठरली, नोटबंदी, राफेल घोटाळा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी, असे मुद्दे घेऊन भुजबळ विरोधकांवर तुटून पडत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका समीर भुजबळ यांच्या पथ्यावर आहे. मोदी आणि अमित शहा यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपला मतदान करून नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले आहे. त्यामुळे आता भुजबळांनी देखील नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीत पक्षाचे नेटवर्क कसे वापरता येईल याचा विचार केला आहे.

मागील लोकसभा निवडणूक स्वतः छगन भुजबळ यांनी लढवली होती. त्या वेळी मोदी लाट, पक्षातील गटबाजी यामुळे भुजबळांना नाशिकमध्ये मोठया फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मागीलनिवडणुकीचा अनुभव घेऊन राजकीय रणनीती आखून भुजबळांनी आता पुतण्या समीर भुजबळ यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. कुठे घोड्यावर तर कुठे बैलगाडीत बसून समीर भुजबळ प्रचारात सहभागी होत आहेत. समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यादेखील प्रचारात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीला सोबत घेऊन मतदार महिलांपर्यंत पोहोचत आहेत.

युतीकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा अजून झाली नसली तरी त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या गाठी-भेटीवर जोर दिला आहे.

पुतण्याच्या प्रचार साठी छगन भुजबळ नाशिक मध्ये तळ ठोकून...
 
नाशिक लोकसभा निवडणुकीत माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे,ह्या निवडणूकीत छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादी कॉग्रेस कडून निवडणूक रिंगणात आहे..समीर भुजबळ ह्यांनी गेल्या दोन महिन्या पासून निवडणूकी साठी मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थितीती लावत मतदारांन पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे..तर राष्ट्रवादी पक्षाने समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर केल्या नंतर छगन भुजबळ ह्यांनी नाशिक मध्ये तळठोकला आहे.तर भुजबळ कुटुंबांतील सर्वांनीच प्रचारात स्वतःला झोकून दिल्याचं दिसत आहे..
   
छगन भुजबळां यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेस,तसेच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे..तर भुजबळ फार्म कार्यलयावर उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते आदींच्या भुजबळ छोट्याखणी बैठक घेत आघाडी च्या काळात नाशिकचा झालेला विकास कामे मतदारांन समोर मांडत आहे,आणि मागील पाच वर्षात भाजप सरकारने दिलेले अश्वासनं कशी फेल ठरलीय,नोटबंदी,राफेल घोटाळा,बेरोजगारी, शेतकरी आत्मह्यात,शेतकरी कर्ज माफी असे मुद्दे घेऊन भुजबळ विरोधकांवर तुटून पडत आहे... 

तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी घेतलेली भूमिका समीर भुजबळ ह्यांच्या पथ्यावर पडली असून,मोदी आणि अमित शहा यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपला मतदान करून नका असं आवाहन राज ठाकरे ह्यानी मतदारांना केलं आहे..त्यामुळे आता भुजबळांनीं देखील नाशिक मधील मनसे पदाधिका ऱ्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीत पक्षाचे नेटवर्क कसे वापरता येईल याचा विचार केला जात आहे..

मागील लोकसभा निवडणुकी स्वतः छगन भुजबळ यांनी लढवली होती..त्या वेळी मोदी लाट,पक्षातील गटबाजी आणि मोठ्या प्रमात जातीय समीकरण झाल्याने भुजबळांना नाशिक मध्ये विकास कामे करून देखील मोठया फरकाने पराभव सहन करावा लागला होता..मागील  निवडणुकीचा अनुभव घेऊन राजकीय रणनीती आखून भुजबळांनीं आता पुतण्या समीर भुजबळ ह्यानां निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.

तर समीर भुजबळ यांचं ठिकठिकाणी कार्यकर्तेनं कडून जोरदार स्वागत केलं जातं आहे, कुठे गोड्यावर तर कुठे बैलगाडी बसून समीर भुजबळ प्रचारत सहभागी होत आहे,समीर भुजबळ यांच्यां पत्नी शेफाली भुजबळ देखील प्रचारात सक्रिय असून राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीला सोबत
घेऊन मतदार महिलांन पर्यन्त पोहचत आहे .

युती कडून खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा अजून झाली नसली तरी त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी भेटीवर जोर दिला आहे..
टीप फीड ftp
Nsk bhujbal baithak viu 1
Nsk bhujbal baithak viu 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.