नाशिक - काहीजण म्हणतात १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होतं. खरे स्वातंत्र्य सन २०१४ नंतर मिळाले. पण २०१४ नंतर देशाला मिळाली ती फक्त महागाई. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही, अशा पोपटपंची करणार्यांना 'पद्मश्री' पुरस्कार दिला जातो, या शब्दात अभिनेत्री कंगनाचे नाव न घेता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. इगतपुरीत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भुजबळांनी कंगनाने केलेल्या विधानाचा धागा पकडत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. २०१४ नंतर देशातील जनतेला महागाई मिळाली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर प्रचंड वाढवले. या वेळी मोदींची नक्कल करत 'न खाऊगा ना खाने दूंगा' याऐवजी 'ना खाऊंगा, ना पकाने दूंगा' या शब्दात त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा - शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू - विक्रम गोखले