ETV Bharat / state

Nashik Accident News : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू - कार ट्रकचा नाशिकमध्ये अपघात एक मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर शहराजवळ सरदवाडी बायपासवर ट्रकला कारने मागून धडक दिल्याने अपघात झाला ( Car Accident Nashik Pune Highway ) आहे. या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाले ( Nashik Accident One Death ) आहे.

Nashik Accident News
Nashik Accident News
author img

By

Published : Apr 21, 2022, 3:53 PM IST

नाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर शहराजवळ ( Car Accident Nashik Pune Highway ) सरदवाडी बायपासवर ट्रकला कारने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला ( Nashik Accident One Death ) आहे. तर, चार जण जखमी झाले आहे. अपघातात कार चक्काचूर झाली आहे.

वाहतूक खोळंबली - मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी गॅसची वाहतूक करणारा एक ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्याला एका भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. श्री क्षेत्र मढी येथून परतत असताना बुधवारी संध्याकाळी हा अपघात घडला. अपघातात एक जण ठार तर कारमधील बालकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती.

पोलिसांना करावी लागली कसरत - अपघातात कारच्या पुढची बाजू चक्काचूर झाली. त्यानंतर जखमी मुले कारच्या आतमध्ये अडकली होती. जखमी मुलांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. अखेर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढल. अपघात प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा - पुण्यात राष्ट्रवादी आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट.. अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.