ETV Bharat / state

निवडणुका संपल्यावर उमेदवार झाले निवांत, जाणून घ्या कोण काय करतय - campaign

दुसऱ्या दिवशी बहुतेकांनी आराम करणे पसंत केले. तर काहीजण आकडेमोडीत दंग झाले होते. निवडणूक तर झाली पण जनतेचा कौल काय लागतो याची चिंता सर्वांनाच भेडसावत आहे. कोणी कितीही आश्‍वासित केले तरी उमेदवारांचे चित्त मात्र जागेवर नाही. २३ मेपर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती राहणार हे मात्र नक्की.

समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे
author img

By

Published : May 2, 2019, 11:51 AM IST

नाशिक - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा खाली बसलाय आहे. उमेदवारांबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही समाधानाचा सुस्कारा सोडला आहे. निवडणुकीच्या काळात दिवसभार धावपळीत दिसणारे विविध पक्षांचे लोक आता निवांत दिसू लागले आहेत.

निवडणुकीच्या काळात सर्व पक्षांच्या लोकांनी प्रचाराला वाहून घेतले होते. दैनंदिन जीवन बिघडले होते. रात्री उशिरा झोपायचे, पहाटे कामाला लागायचे असा एकूणच दिनक्रम ठरलेला होता. त्यातच ठिक ठिकाणच्या प्रचार रॅली ,चौक सभा, जाहीर सभा, जनतेच्या गाठीभेटी, याबरोबरच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे रुसवे - फुगवे काढताना उमेदवारांची मोठी कसरत होत होती. एकदाची मतदान प्रक्रिया पार पडली आणि सर्वांनीच हुश्श म्हणत सुटकेचा निश्वास सोडला.

दुसऱ्या दिवशी बहुतेकांनी आराम करणे पसंत केले. तर काहीजण आकडेमोडीत दंग झाले होते. निवडणूक तर झाली पण जनतेचा कौल काय लागतो याची चिंता सर्वांनाच भेडसावत आहे. कोणी कितीही आश्‍वासित केले तरी उमेदवारांचे चित्त मात्र जागेवर नाही. २३ मेपर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती राहणार हे मात्र नक्की.

या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा कानोसा घेतला असता मनोरंजक गोष्टी ऐकावयला आल्या-

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ हे नाशिकलाच असून कुटुंबीयांसमवेत ते आपला बराचसा वेळ व्यथित करताना दिसत आहेत. प्रचाराच्या कालावधीत पत्नी शेफाली भुजबळ यांनी देखील स्वतःला प्रचारात झोकुन दिले होते. त्यामुळे मुलीशीही क्वचितच संपर्क होत राहिला. ही राहिलेली कसर भरून काढताना समीर भुजबळ यांनी कुटुंबीयांनाच वेळ देणे पसंत केले.

अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार माणिकराव कोकाटे हे अल्पशा श्रमपरिहार करून आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले. गावोगावी असलेले कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्याशी प्रत्यक्ष अथवा फोनवरून संपर्क साधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे प्रथम पासूनच चर्चेत राहिले. मतांची मोठी व्होट बँक असल्याने तसेच दांडगा जनसंपर्क असल्याने पवन पवार यांनी आव्हान उभे केले होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पवार हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून सर्वांचे आभार मानत आहेत.

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्रांती घेणे पसंत केले. यादरम्यान पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या संपर्कात कायम राहिले. दोन दिवसानंतर गोडसे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यां बरोबर देवदर्शनासाठी प्रयाण केले. पाच वर्षांपूर्वीही ते वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यंदाही ते तिथेच गेल्याचे समजते.

Intro:मतदान प्रक्रिया नंतर उमेदवारांनी सोडला सुटकेचा निःश्वास, काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे मानले आभार तर काही उमेदवार देवा चरणी लिन..

Body:गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराडा खाली बसलाय,आणि उमेदवारांबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही समाधानाचा सुस्कारा सोडला,
या कालावधीत संपूर्ण व्यस्त जीवन जगतांना साऱ्यांनीच प्रचाराला वाहून घेतलं होतं,एकूणच दैनंदिन जीवन बिघडलं होती, रात्री उशिरानं निद्रस्त व्हायचं आणि उणिपूरी तीन चार तासाची झोप घेऊन पहाटे कामाला लागायचं,असा एकूणच माहोल होता,
त्यातच ठिक ठिकाणच्या प्रचार रॅली ,चौक सभा,जाहीर सभा, जनतेच्या गाठीभेटी, याबरोबरच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढताना उमेदवारांची मोठी कसरत होत होती,
कशी काय एकदाची मतदान प्रक्रिया पार पडली, आणि सर्वांनीच हुश्श म्हणतं सुटकेचा निश्वास सोडला,

दुसऱ्या दिवशी बहुतेकांनी आराम करणे पसंत केला, तर काहीजण आकडेमोडीत दंग झाले होते, निवडणुकीत तर झाली पण जनतेचा कौल काय लागतो याची चिंता सर्वांनाच भेडसावत होती,कोणी कितीही आश्‍वासित केलं तरी उमेदवारांचं चित मात्र जागेवर नव्हतं,आणि ते 23 मेपर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती राहणार हे मात्र नक्की,

या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा कानोसा घेतला असता मनोरंजक गोष्टी ऐकावयला आल्या,

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ हे नाशिकलाच असून कुटुंबीयांसमवेत ते आपला बराचसा वेळ व्यथित करताना दिसतायेत ,प्रचाराच्या कालावधीत पत्नी शेफाली भुजबळ यांनी देखील स्वतःला प्रचारात झोकुन दिलं होतं, त्यामुळे मुलीशी ही क्वचितच संपर्क होत राहिला,ही राहिलेली कसर भरून काढताना समीर भुजबळ यांनी कुटुंबांनाच वेळ देणं पसंत केलं ,

अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार माणिकराव कोकाटे हे अल्पशा श्रमपरिहार करून आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले, गावोगावी असलेले कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्याशी प्रत्यक्ष अथवा फोनवरून संपर्क साधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताहेत ...

वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे प्रथम पासूनच चर्चेत राहिले,मतांची मोठी व्होट बँक असल्यानं तसेच दांडगा जनसंपर्क असल्याने पवन पवार यांनी आव्हान उभं केलं होतं..मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पवार हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून सर्वांचे आभार मान्यावर भर देत आहे...

राहता राहिले ते महायुतीचे उमेदवार तथा खासदार हेमंत गोडसे,गोडसे यांनी प्रचाराच्या प्रत्येक दिवस आधीपासूनच मतदारांची बांधणी करण्यावर भर दिला होता,प्रत्यक्ष प्रचारांत अंती त्यांनी गावोगावी, शहरवस्तीत जाऊन मतदारांशी थेट संपर्क ठेवला,राजकीय अंदाज- आडाखे यामुळे चर्चेत राहणाऱ्या हेमंत गोडसे यांनी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्रांती घेणं पसंत केला,यादरम्यान पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या संपर्कात कायम राहिले, दोन दिवसानंतर गोडसे आपल्या निष्ठावंत बरोबर देवदर्शनासाठी प्रयाण केलं..पाच वर्षांपूर्वी ही ते वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेले होते,यंदा ही ते ते मातेच्या चरणी लीन होण्यासाठी गेले असल्याचे वृत्त आहे

टीप बातमीला उमेदवारांचे फोटो वापरावेत...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.