नाशिक (येवला) - मोठ्या आशेने काळ्या आईच्या उदरात धान फेकायच आणि काहीतही सुख हाताला लागल म्हणून वाट पाहत बसायच. पण निसर्ग कधी कोणत रुप घेईल हे सांगणार यंत्र कुठच नाही. सगळ काही सुरळीत चाललय या आनंदाच्या दरबारात सबंध मानवी सामाज चाललेला असताना, कोरोना नावाची महामारी आली आणि एका रात्रीत जगभरातल्या वर्दळीला शांत करून गेली. एका गावत आणि एका तालुक्यात नाही तर, सबंध जगाला या रोगाने वेढा टाकला. यामध्ये पिकवणाऱ्यापासून फक्त खाणाऱ्यापर्यंत सगळे अडचणीच्या दारात गेलेत. या कोरोनासह सराईत येणाऱ्या रोगाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या संकटामुळे 4 एकरवर पसरलेल्या डाळिंबाच्या बागेवर कुऱ्हाड चालवावी लागलीये ती येवला तालुक्यातील पिंपरी या गावातील शेतकऱ्याला.
डाळिंब पिकावर तेल्या रोग
येवला तालुक्यात परिसरात अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब पीक घेतले जाते. परंतु सततच्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात सतत घट होत असल्याने, संतप्त होत तालुक्यातील पिंपरी गावातील भगवान ठोंबरे या शेतकऱ्याने 4 एकर डाळिंब बागावर कुऱ्हाड चालवत तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने तोडून टाकला आहे. लाखो रुपये खर्च करून डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत पडले असून, अनेकांनी डाळिंब बाग तोडून टाकला आहे.
कोरोनाचा देखील डाळिंब विक्रीस फटका
कोरोनामुळे ज्यावेळेस लॉकडाऊन लावण्यात येते, त्यावेळी डाळिंब विक्री होत नाही. त्यामुळे तोडलेले डाळिंब तसेच, पडून राहतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशी प्रतिक्रिया डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आज 4 एकरवरील डाळिंबाची बाग तोडून टाकावी लागली हे सांगताना शेतकऱ्याला गहिवरून आले होते.