ETV Bharat / state

नाशिक : पेरले पण उगवले नाही.. सोयाबीननंतर कोबीच्या पिकाची बोगस बियाणे - nashik farmer news

सोयाबिननंतर आता कोबीच्या बोगस बियाणांचे प्रकार उघडकीस येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात तक्रार दाखल करावी व कायदेशीर कारवाई करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

कोबी
कोबी
author img

By

Published : Jul 13, 2020, 5:18 AM IST

नाशिक (बागलाण) - बोगस कोबी बियाण्यांमुळे बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येत आहे. फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात तक्रार दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात कोबी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या वातावरण थंड असल्याने कोबी उत्पादक शेतकरी जून महिन्यात सुरुवातीला विविध प्रकारच्या बियाण्यांची निवड करुन रोप तयार करतात. नंतर महिन्याच्या अंतराने कोबी पिकाची लागवड केली जाते. साधारणता 21 दिवसानंतर बियाणे लागवडीसाठी उपयुक्त होते. बागलाण तालुक्यातील दसवेल येथे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकंऱ्यानी अँडव्हान्टा गोल्डन सिड कंपनीचे युरो 2 हे बियाणे लागवडीसाठी टाकले होते. पण, 8 ते 10 दिवस उलटूनही ते बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दसवेल येथील शेतकरी राजेंद्र निकम, बाबाजी भामरे, बापू भामरे, बाळू भामरे आदी शेतकऱ्यांनी युरो 2 कंपनीच्या प्रत्येकी 70 ते 80 पुड्या कमी-जास्त प्रमाणात टाकल्या आहेत. मात्र, बियाणे उगवण्याची प्रतिक्षा करण्यात बराच काळ उलटला तरी बियाणे उगवलेले नाही. यात शेतकऱ्यांच्या वेळेचा व हजारो रुपयांचे नुकसान झाला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांमार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांना उद्भवलेल्या समस्येविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाले नाही. त्यामुळे उपोरोक्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांना निवेदन देऊन, चौकशी करून संबधीत कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची व नुकसान भरपाई मिळण्याची मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक बोगस कंपन्या शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा पुरवठा करून हजारो रुपयांचा गंडा घालत आहेत. यात सोयाबीन, कापूस आणि आता कोबी बियाणाची भर पडली आहे. अशा बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांंचा शोध घेऊन कारवाई करावी अन्यथा अशा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय; भात लावणीच्या कामाला वेग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.