नाशिक - लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असले तरी गिरीष महाजन हे 'मॅन ऑफ द मॅच' असल्याचे बोलले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा मोठ्या फरकाने निवडणून आणण्याचा 'करिष्मा' गिरिष महाजन यांनी करून दाखवला आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात आणि केंद्रातही गिरिष महाजन यांचे राजकीय 'वजन' आणखी वाढले आहे.
सरकारचे संकटमोचक असलेल्या गिरिष महाजन यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपला करिष्मा करून दाखवला आहे. उत्तर महाराष्ट्रतल्या नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार, शिर्डी आणि नगर या सगळ्या जागांची जबाबदारी गिरिष महाजन यांनी घेतली होती. यापैकी दिंडोरी, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जागांबाबत संभ्रम होता. तेव्हा महाजनांनी आठही जागेवर भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून येतील, असा दावा केला होता. तो खरा ठरला आहे.
उत्तर महाराष्ट्रात लाखांच्या फरकाने निवडूण आलेले उमेदवार -
दिंडोरी -
भारती पवार - 5,67,098
धनराज महाले - 3,68,287
दोघांमधील फरक - 1,98,811
नाशिक -
हेमंत गोडसे - 5,61,812
समिर भुजबळ - 2,70,731
दोघांमधील फरक - 2,91,081
धुळे -
सुभाष भामरे - 6,13,533
कुणाल पाटील - 3,84,290
दोघांमधील फरक - 2,29,243
अहमदनगर -
सुजय विखे पाटील - 6,96,961
संग्राम जगताप - 4,19,364
दोघांमधील फरक - 2,77,597
नंदुरबार -
हिना गावित - 6,39,136
के. सी. पाडवी - 5,43,507
दोघांमधील फरक - 9,56,29
रावेर -
रक्षा खडसे - 6,55,386
उल्हास पाटील - 3,19,504
दोघांमधील फरक - 3,35,882
जळगाव -
उन्मेष पाटील - 7,13,874
गुलाबराव देवकर - 3,02,257
दोघांमधील फरक - 4,11,617
या सगळ्या आकड्यांवरून आपल्याला लक्षात येईल, गिरिष महाजन यांनी जबाबदारी घेतलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागांवर युतीच्या उमेदवारांनी लाखांच्या मतांनी विजयी झाले आहेत. गिरिष महाजनांचे 'होम पिच' असलेल्या जळगावमध्ये तर उन्मेष पाटील यांनी रेकॉर्डब्रेक 4 लाखांच्या आघाडीने विरोधकांना पराभूत केले आहे.