ETV Bharat / state

"कोरोना कोणाची जात बघत नाही.. लस येईपर्यंत लढाई सुरुच" - chhagan bhujbal nashik

नाशिकमध्ये 'मिशन नाशिक झिरो’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यावर पूर्णपणे नियंत्रण भारतीय जैन संघटना करणार असून फिरते दवाखाने कंन्टेंन्मेट झोनमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येणार आले. तसचे अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.

battle-continues-until-vaccine-arrives-said-chhagan-bhujbal-at-nashik
छगन भुजबळ
author img

By

Published : Jul 21, 2020, 4:34 PM IST

Updated : Jul 21, 2020, 4:52 PM IST

नाशिक- लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरुच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. महापालिकेच्या माध्यमातून भारतीय जैन संघटना व सामाजिक संस्थांच्या ‘मिशन नाशिक झिरो’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

battle-continues-until-vaccine-arrives-said-chhagan-bhujbal-at-nashik
‘मिशन नाशिक झिरो

नाशिकमध्ये 'मिशन नाशिक झिरो’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यावर पूर्णपणे नियंत्रण भारतीय जैन संघटना करणार असून फिरते दवाखाने कंन्टेंन्मेट झोनमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येणार आले. तसचे अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये ‘मिशन झिरो’ हा उपक्रम कोरोनाला अटकाव आणण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे. हे काम कौतुकास्पद आहे. हे काम जबाबदारी आणि कष्टाने करावे लागणार आहे. कोरोना कोणाची जात बघत नाही, आपण मनुष्य आहोत, याचा विचार करुन जे मापदंड हा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित करुन देण्यात आले आहेत त्यांचे पालन करण्याची गरज आहे.

कोरोनाच्या काळात कोरोना हाच आपल्या सर्वांचा प्रतिपक्ष असून आपल्या सर्वांना कोरोनाविरुद्ध एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे. कोरोनाला घाबरुन त्याचा सामना जग करू शकत नाही. ही लढाई एक प्रकारची माणूसकीविरुद्धची लढाई समजूनच प्रत्येकाने त्याचा सामना करावयाचा आहे. समाज माध्यमांचा वापर करुन नागरिकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवून मदत करण्याची गरज असून केवळ शासन आणि महापालिका यात यशस्वी होवू शकत नाही, त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन लोकसहभागातून आपण यावर मात करू शकतो. मुंबई पुण्यानंतर नाशिक आता कोरोनाचे नेक्स्ट डेस्टिनेशन होत आहे. त्यामुळे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दृढनिश्चयाने प्रयत्न करावे लागतील.

लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी अहोरात्र काम करत आहेत. यांच्या श्रमाला आपला सलाम असून हेच सर्व आपल्यासाठी आता देव आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहराला दिलासा देण्याचे काम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यामाध्यमातून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यात येत आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण शोधता आले आहेत. त्यातून रुग्ण जरी वाढत असले तरी त्यासाठी भरीव उपाययोजनाही करण्यात येत आहेत. सामाजिक सहभागातून कोरोनावर मात करण्यासाठी विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून ‘मिशन नाशिक झिरो’ राबविण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना होत असून नागरिकांनी आरोग्य सेवकांना चांगली वागणूक द्यावी, तसेच यासाठी पोलीस यंत्रणेने यावर लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याप्रसंगी केले.

जैन संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ४९ ठिकाणी फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अद्यापपर्यंत १६ लाख रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने ‘मिशन झिरो’ ही संकल्पना तयार करुन काम करण्यात येत आहे. कोरोनाची कुठलीही भीती बाळगू नये, यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे. आता कोरोनासह आपल्याला जगायचे आहे, यासाठी तशी मानसिकता तयार करुन उपाययोजना करायला हव्या यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढे यायला हवे, असे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सांगितले.

Last Updated : Jul 21, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.