ETV Bharat / state

Leopard In Nashik: गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात बिबट्याचा अडथळा

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. (Leopard In Nashik). त्यामुळे येथे जाण्यास कर्मचाऱ्यांना भीती वाटत असल्याने गोदावरीचे प्रदूषण (pollution of godavari river) रोखण्यात अडथळा येतो आहे.

Leopard In Nashik
Leopard In Nashik
author img

By

Published : Nov 4, 2022, 7:42 PM IST

नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. (Leopard In Nashik). त्यामुळे येथे जाण्यास कर्मचाऱ्यांना भीती वाटत असल्याने गोदावरीचे प्रदूषण (pollution of godavari river) रोखण्यात अडथळा येतो आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोनदा बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये दहशत: पिंपळगाव खांब परिसरात वालदेवी नदीच्या काठी नवीन मलनिस्सारण केंद्राची देखभाल दुरुस्ती तसेच नियमित ऑपरेशनचे काम ठेकेदाराकडे आहे. हे काम बघण्यासाठी ठेकेदाराने दिवस आणि रात्र पाळीत प्रत्येकी सहा ते सात कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. काम करत असताना साडे आठच्या सुमारास या परिसरात कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसला होता. कर्मचाऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेत आरडा ओरड केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र पुन्हा दोन दिवसांनी मलनिस्सारण केंद्र परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ठेकेदारांनी ही बाब यांत्रिकी विभागतील अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर अभियंता बाजीराव माळी यांनी वन विभागाकडे याबाबत तक्रार केली असून, बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी वन विभागाने पिंजरा देखील लावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.