ETV Bharat / state

औरंगाबाद विमानतळाला अजंठा-वेरूळ नाव द्यावे - रामदास आठवले - रामदास आठवले औरंगाबाद विमानतळ

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून संघर्ष सुरू असताना औरंगाबाद विमानतळाला अजंठा-वेरूळ नाव द्यावे, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Jan 8, 2021, 8:45 PM IST

नाशिक - औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून संघर्ष सुरू असताना औरंगाबाद विमानतळाला अजंठा-वेरूळ नाव द्यावे, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाशिक

संभाजीराजेंच्या नावाला विरोध नाही, मात्र औरंगाबाद विमानतळाला अजंठा-वेरूळ नाव द्यावे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. औरंगाबाद नामांतरावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद होत असून शिवसेना किमान समान कार्यक्रम डावलत असून काँग्रेस सरकारमधून बाहेर पडू शकते आणि पुन्हा भाजपची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू शकतात असेही आठवले यांनी म्हटले आहे.

शेतकरी कायदे रद्द होऊ शकत नाहीत

लोकसभेचे अधिवेशन दोन टप्प्यात राहणार आहे. शेतकरी जगला पाहिजे, ही सरकारची भावना आहे, मात्र शेतकरी कायद्यावरून शेतकऱ्यांचा गैरसमज झाला आहे. इतक्या दिवस आंदोलन करणे चुकीचे असून, आंदोलकांच्या भावना देखील आम्ही समजू शकत. पण, शेतकरी नेत्यांना मार्ग काढायचा नाही, लोकशाहीनुसार कायदा केला जातो, असे कायदे रद्द केले तर संसदेला अर्थ उरणार नाही. सरकार आणि शेतकरी एकत्र येऊन कायद्यात सुधारणा करू शकतात, पण केलेले कायदे रद्द होणे शक्य नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणे आमच्या फायद्याचे

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणे आमच्यासाठी फायद्याचे असून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत त्याचा आम्हाला फायदाच होईल आणि त्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष 350 पेक्ष्या अधिक जागा जिंकू, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

'ईडी' कारवाई सरकार करत नाही

'ईडी'ची कारवाई केंद्र सरकार करत नाही, ती स्वतंत्र यंत्रणा आहे. संजय राऊत यांच्यांकडे कोणाचे नावे असतील तर त्यांनी द्यावी, त्यांच्या विरोधात पुरावे असतील तर तिथे पण कारवाई होऊ शकते. ईडीची चौकशी होऊ नये याकरिता माझ्यासारखे काम करावे, बरोबर हिशोब ठेवला नाही तर ईडी मागे लागते. प्राप्तिकर वाचवण्यासाठी पेपरमध्ये हेराफेरी केली त्यांच्या मागे लागली ईडी, असा टोला रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.