ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; लासलगाव परिसरातील घटना - dattnagar nashik

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर धारदार शस्त्राने वार केला आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहेत.

दत्तनगर येथील घटना
author img

By

Published : Sep 7, 2019, 8:30 PM IST

नाशिक : लासलगाव-कोटमगाव या रस्त्यावरील दत्तनगर एका तरुणीच्या घरात घुसुन एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. एकतर्फी प्रेमातून युवतीवर हा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

तरुतीवर प्राणघातक हल्ला

सतीश ढगे असे आरोपीचे नाव आहे. सतिशने रागाच्या भरात या तरुणीवर चाकूने तब्बल 18 वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सतीश ने स्वतःवर ही चाकूने वार केला. त्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

तरुण-तरुणी हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये बारावीत शिकत होते. सतीशने एकतर्फी प्रेमातून हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.के.पांढरे यांनी सांगितले.

Intro:लासलगाव कोटमगाव रस्त्यावरील दत्तनगर येथे १२वी मध्ये शिकणाऱ्या युवतीच्या घरात घुसुन एका माथेफिरू तरूनाने धारदार शस्त्राने वार कले या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली असुन एकतर्फी प्रेमातून आतिश ढगे या युवकाने युवतीवर प्राणघातक हल्ला करून स्वतःवरही धारदार शस्त्राने वार करून करून घेतले या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे
Body:सतीश ढगे याने रागाच्या भरात तरुणीवर चाकूने तब्बल 18 वार केल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लासलगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तीला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तेथे ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सतीश ने स्वतःवर ही चाकूने वार केल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याला ही पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.दोघे एकाच कॉलेज मध्ये बारावीत शिकत होते त्यामुळे एक तर्फी प्रेमातून सतीश ने हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे एस.के.पांढरे साह्यक पोलिस निरीक्षक यानी सांगितले

बाईट:-एस.के.पांढरे साह्यक पोलिस निरीक्षक..Conclusion:या घटनेचा स्थानिक नागरीकांनी निषेध केला असुन लासलगाव नगरीत महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो या गोष्टी परत घडू नये यासाठी गावकऱ्यांनी अरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पोलिसांना केलीय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.