नाशिक : त्रंबकेश्वर रस्त्यावरील ग्रेप्स काऊंटी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध देशातून आलेल्या मॉडेल्सने आपला कलाविष्कार सादर केला. महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांच्या संकल्पनेनुसार यात भारतीय परंपरेनुसार जुन्या पद्धतीची केशभूषा, वेशभूषा, अलंकार यांचे प्रदर्शन झाले. मेकअप त्वचा, नखे यांची निगा यावर मार्गदर्शन करण्यात ( Makeup Guidance ) आले. पाश्चिमात्य पद्धतीने फॅशन शोमध्ये( Western Style Fashion Show ) तोकड्या वस्त्रात कॅट वॉक करणाऱ्या ललनांनीच्या या शोमध्ये भारतीय वस्त्रप्रावरणानुसार अंगभर वस्त्र परिधान केलेल्या ललनांनी आपला सौंदर्य अविष्कार सादर केला. यावेळी स्थानिक मॉडेलसोबत विदेशातील मॉडेल्सने आविष्कार ( Fashion Show Of Models ) दाखवला.
हिंदू पुराणकथा, वेद, महाकाव्ये व नाट्यशास्त्राच्या आधारे नावे : आहेत अद्रिका,अल्मविशा,अंबिका,अन्वद्या,अनुचना, अरूणा, असिता, बुदबुदा, देवी, घृताची, गुणमुख्या, गुणवरा, काम्या, कर्णिका, केशिनी, क्षेमा, चित्रलेखा, लता, लक्ष्मणा, मनोरमा, मरिची, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, पूर्वचित्ती, रक्षिता, रंभा, रितुशाला, सहजन्या, समिची, सौदामिनी, सौरभेदी, शरद्वती, शुचिका, सोमा, सुवाहू, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुरता, सुलोचना, तिलोत्तमा, उमलोचा, उर्वशी, वपु, वर्गा, विद्युत्पर्णा आणि विश्वची. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो. इंद्राच्या दरबारात 26 अप्सरा होत्या.त्यापैकी उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.
देवतांनाही सुटला नाही शृंगार : भाग्यश्री देशपांडे-धर्माधिकारी यांचे IBT तर्फे फॅशन शास्त्र 2022 मोठ्या उत्साहात संपन्न झाले. पुराणानुसार शृंगाररस हा देवी देवतांनाही सुटला नाही व त्या शृंगार रसाने पुराणानुसार ज्या सर्वोच्च सौंदर्यवती आहेत त्या म्हणजे अप्सरा. अशा पवित्र संकल्पनेतून या फॅशन शोमध्ये अप्सरांचे अवतरण करण्यात आले. धर्म शास्त्रातील विषेश मार्गदर्शन महंत अनिकेतशास्त्रींचे लाभले.