ETV Bharat / state

Meal According To Caste : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जातिभेद; गावजेवणात जातीनुसार बसतात पंगती, 'अंनिस'ने केली कारवाईची मागणी - Andhashraddha Nirmoolan Samiti trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर येथे जातीभेदाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील गावजेवणात जातीनुसार पंगतीचे आयोजन केले जाते, असे समोर आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेची नोंद घेऊन तहसीलदारांना या प्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.

trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर
author img

By

Published : Apr 22, 2023, 8:21 PM IST

डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह, अंनिस

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गावजेवणात जातीभेद होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते, तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत होते. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत बंद व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

गावात दरवर्षी गाव जेवण आयोजित केले जाते : अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी गाव जेवण आयोजित केले जाते. चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची धार्मिक कर्मकांडे केल्यानंतर या गावजेवणाचे आयोजन केल्या जाते. त्यासाठी संपूर्ण गावातून वर्गणी तसेच वस्तू रुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सर्वच सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक येथे जेवणासाठी येतात. मात्र या गावोत्सवात एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते व त्यांची जेवणाची पंगत सुद्धा इतर बहुजन समाज घटकांपासून वेगळी बसते.

'ही घटना राज्यघटनेचे उल्लंघन करणारी' : महादेवी ट्रस्ट कडून सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी असा संतापजनक व मानवतेला कलंक असणारा जातीभेदाचा प्रकार येथे वर्षांनुवर्षे राजरोसपणे घडतो आहे, असे तेथील काही स्थानिक लोकांनी महाराष्ट्र अंनिसच्या लक्षात आणून दिले. जर संबंधित महादेवी ट्रस्टकडून असा जातीभेद होत असेल तर ही घटना या देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारी आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे. महादेवी ट्रस्टकडून उद्या गावजेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

अंनिसचे तहसीलदारांकडे निवेदन : जर गावातील सर्वांकडून वर्गणी जमा करून गावजेवण दिले जात असेल, तर तेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांसाठी एकाच वेळी अन्न शिजवून सर्व गावकऱ्यांनी एकाच पंक्तीत बसून जेवण करायला हवे, असे अंनिसने म्हटले आहे. तसेच यासाठी संबंधितांना लेखी पत्राद्वारे समज देण्याची मागणी अंनिसने त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांकडे केली आहे. धार्मिक विधी व कर्मकांडाच्या नावाने त्र्यंबकेश्वर तालुका कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणीही जर असे घटनाबाह्य प्रकार चालू असतील तर ते कायमस्वरूपी बंद करावेत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, ॲड. समीर शिंदे, त्र्यंबकेश्वर कार्याध्यक्ष संजय हराळे, प्रा. डाॅ. सुदेश घोडेराव, त्र्यंबकेश्वर प्रधान सचिव दिलीप काळे यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा : Heatstroke and Corona Deaths : राज्यात कोरोना वाढ अन् उष्माघात एकाचवेळी; मृत्यूचा आकडा शंभरी पार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.