ETV Bharat / state

डॉ. नमिता यांचा सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास; उत्सव "ती"ला प्रारंभ

आकाशवाणी नाशिकच्या रौप्य महोत्सवानिमित्त उत्सव "ती" या महिला महोत्सवाचे साप्ताहिक आयोजन १ मार्च ते ८ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. "ती" या उत्सवाला सुरुवात झाली असून 'मिसेस ग्लोबल युनाइटेड लाईफटाइम क्वीन' हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या डॉ. नमिता कोहोक यांच्याशी मेघा बुरकुले यांनी मुक्त सवांद साधला.

नाशिक1
author img

By

Published : Mar 2, 2019, 3:31 PM IST

नाशिक - आकाशवाणी नाशिकच्या रौप्य महोत्सवानिमित्त उत्सव "ती" या महिला महोत्सवाचे साप्ताहिक आयोजन १मार्च ते ८मार्च दरम्यान करण्यात आले आहे.

"ती" या उत्सवाला सुरुवात झाली असून 'मिसेस ग्लोबल युनाइटेड लाईफटाइम क्वीन' हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या डॉ. नमिता कोहोक यांच्याशी मेघा बुरकुले यांनी मुक्त सवांद साधला. यावेळी डॉ. नमिता यांनी त्यांचा "कॅन्सर ते क्राऊन" हा मन हेलावून टाकणारा प्रवास उलगडला. हा संपूर्ण प्रवास "नमिता की कहानी नमिता की जुबानी" ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.

कॅन्सर या दुर्धर आजराशी दोन हात करताना "व्हाय मी" अस सतत देवाला प्रश्न करताना जणू परमेश्वराने उत्तर दिले "ट्राय मी" आणि तेथून खरा कॅन्सर ते क्राऊन हा प्रवास सुरु झाला असही डॉ. नमिता म्हणाल्या. त्यानंतर त्या विविध क्षेत्रातील आणि देशातील ४० हून अधिक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. कोणताही आजार हा शारीरिक पेक्षा मानसिक अधिक असतो आणि त्यामुळे माणूस अधिक खचतो. पण, अशा परिस्थितीत मनोबल पक्के ठेवले आणि सकारात्मक राहिले तर कोणत्याही दुर्धर आजारावर मात करता येते, असेही त्या म्हणाल्या.

undefined
नाशिक6
लोकांना त्यांच्या कठीण परिस्थितीत बळ मिळावे म्हणून डॉ. नमिता यांनी आतापर्यंत ४०० पेक्षाही अधिक "टॉक शो" घेतले आहेत. ज्यात त्यांनी जगभरातील विविध रोगग्रस्त आणि पीडित लोकांशी संवाद साधला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी 'कॅन्सर ते क्राऊन' हा प्रवास सुंदर होता. कारण, त्यात माणसं जोडली गेली, खूप शिकायला मिळाले, असे म्हणत त्यांनी सगळ्यांना भारवून टाकले. आकाशवाणीच्या प्रांगणात झालेल्या या महोत्सवाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमात अनुराधा मतकरी, देविका, सुनीता तारापुरे, सुजाता गायधनी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी हुतात्मा निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Intro:Body:

All India Radio for the Silver Jubilee Ti festivel start in nashik

डॉ. नमिता यांचा सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास; उत्सव "ती"ला प्रारंभ

नाशिक - आकाशवाणी नाशिकच्या रौप्य महोत्सवानिमित्त उत्सव "ती" या महिला महोत्सवाचे साप्ताहिक आयोजन 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान करण्यात आले आहे.

"ती" या उत्सवाला सुरुवात झाली असून 'मिसेस ग्लोबल युनाइटेड लाईफटाइम क्वीन' हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या डॉ. नमिता कोहोक यांच्याशी मेघा बुरकुले यांनी मुक्त सवांद साधला. यावेळी डॉ. नमिता यांनी त्यांचा "कॅन्सर ते क्राऊन" हा मन हेलावून टाकणारा प्रवास उलगडला. हा संपूर्ण प्रवास "नमिता की कहानी नमिता की जुबानी" ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. 

कॅन्सर या दुर्धर आजराशी दोन हात करताना "व्हाय मी" अस सतत देवाला प्रश्न करताना जणू परमेश्वराने उत्तर दिले "ट्राय मी" आणि तेथून खरा कॅन्सर ते क्राऊन हा प्रवास सुरु झाला असही डॉ. नमिता म्हणाल्या. त्यानंतर त्या विविध क्षेत्रातील आणि देशातील ४० हून अधिक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. कोणताही आजार हा शारीरिक पेक्षा मानसिक अधिक असतो आणि त्यामुळे माणूस अधिक खचतो. पण, अशा परिस्थितीत मनोबल पक्के ठेवले आणि सकारात्मक राहिले तर कोणत्याही दुर्धर आजारावर मात करता येते, असेही त्या म्हणाल्या. 

लोकांना त्यांच्या कठीण परिस्थितीत बळ मिळावे म्हणून डॉ. नमिता यांनी आतापर्यंत ४०० पेक्षाही अधिक "टॉक शो" घेतले आहेत. ज्यात त्यांनी जगभरातील विविध रोगग्रस्त आणि पीडित लोकांशी संवाद साधला आहे. कार्यक्रमाच्या  शेवटी 'कॅन्सर ते क्राऊन' हा प्रवास सुंदर होता. कारण, त्यात माणसं जोडली गेली, खूप शिकायला मिळाले, असे म्हणत त्यांनी सगळ्यांना भारवून टाकले. आकाशवाणीच्या प्रांगणात झालेल्या या महोत्सवाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमात अनुराधा मतकरी, देविका, सुनीता तारापुरे, सुजाता गायधनी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी हुतात्मा निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.