नाशिक Ajit Pawar in Nashik : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असता, शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. तसंच अजित पवारांचा ताफा कळवण येथे जात असता कांदा टोमॅटो उत्पादकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनासमोर टोमॅटो व कांदे फेकून निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तसंच यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा 'लाल चिखल' : दोन महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यात दीडशे रुपये किलोने जाणाऱ्या टोमॅटोला बाजार समितीमध्ये सध्या दीड रुपये भाव मिळतोय. तसंच बाजार समितीत आणलेला मालही व्यापारी घेत नसल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी दिंडोरी बाजार समितीच्या मुख्य आवारासमोर रस्त्यावर टोमॅटो फेकून शासनाचा निषेध केला. टोमॅटोसाठी शेतकऱ्यांना एकरी दीड लाखपर्यंत खर्च येतो. परंतु उत्पन्न काही रुपयात मिळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय. एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक मोठ्या कष्टानं जगविलं आणि पिकविलं. मात्र सध्या मिळत असलेला बाजार भाव 50 ते 70 रुपये कॅरेट यात साधा टोमॅटो खुडण्याचा आणि बाजारात नेईपर्यंतचा खर्च सुद्धा निघत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा लाल चिखल झालाय.
पिकावरील खर्चही वसूल होणार नाही : पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही चांगले बाजारभाव मिळतील म्हणून टोमॅटोचे पीक घेतले जाते. मात्र आज याच टोमॅटोला मार्केटमध्ये प्रतिकिलोस दोन ते तीन रुपयांचा बाजारभाव मिळतोय. यामुळे टोमॅटो पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नसल्याचं शेतकरी सांगताय.
हेही वाचा -