ETV Bharat / state

Temple of Kamakhya Devi : आसामनंतर निफाडच्या धारणगावात होतेय कामाख्या देवीचे मंदिर

भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटीत कामाख्या देवीचे एकमेव मंदिर आहे. मात्र, आता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गावात कामख्या देवीच्या मंदिराची उभारणी सुरु आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांना आसामला न जाता निफाड तालुक्यातील धरणगावात कामख्या देवीचे दर्शन घेता येणार आहे.

Temple of Kamakhya Devi
Temple of Kamakhya Devi
author img

By

Published : Jun 25, 2023, 5:22 PM IST

निफाडच्या धारणगावात कामाख्या देवीचे मंदिर

निफाड : भारत देशातील आसाम राज्यामध्ये गुवाहाटी येथे एकमेव कामाख्या देवीचे मंदिर असुन या कामाख्या शक्तिपीठावर लोकांची विशेष श्रध्दा आहे. हे देशातील एकमेव मंदिर असुन देशात इतर कोठेही या देवीचे मंदिर नाही. मात्र, आता नाशिक जिल्ह्यातील पुर्व दिशेला असलेल्या धारणगांव खडक येथे कामाख्या देवीचे गुवाहटी नंतर दुसऱ्या मंदिराची निर्मीती होत आहे. सुमारे दोन एकरावर सिध्द कामाख्या देवी मंदिराची निर्मिती होत असून, दोन एकर श्रेत्रापैकी सुमारे ५६ हजार स्केअर फुट (सव्वा एकर) क्षेत्रावर मंदिराचे बांधकाम पुर्णत्वाकडे आहे.

महाराष्ट्रातील एकमेव कामाख्या देवीचे मंदिर : या मंदिराची उभारणी सुमारे १११ खांबांवर करण्य़ात आलेली असुन प्रत्येक खांबाच्या चहुबाजुने देव-देविकांच्या मुर्त्यांच्या प्रतिकृती कोरण्यात आलेल्या आहेत. या मंदिराच्या उभारणीसाठी बंगाल, मध्यप्रदेश, नांदेड, राजस्थान येथील सुमारे २५० कारागिर मेहनत घेत आहे. गणेश महाराज जगताप यांच्या प्रयत्नातुन महाराष्ट्रातील एकमेव कामाख्या देवीचे मंदिर तयार होत आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारातुन आत प्रवेश केल्यावर पुर्व बाजुने भव्यदिव्य आणि आकर्षक श्री गणेश मंदिर आहेत. तर पश्चिमेला शिवपार्वती मंदिर निर्मिती होतेय. उत्तर बाजुला धन कुबेर, धनलक्ष्मी, धनदिप या देवतांच्या मंदिरांची निर्मीती करण्यात आलेली आहेत.

देशातील एकमेव मंदिर : देशातील आसाम राज्यामध्ये गुवाहाटी येथे एकमेव कामाख्या देवीचे मंदिर असुन या कामाख्या शक्तिपीठावर लोकांची विशेष श्रध्दा आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णु यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीरचे ५१ भाग केले होते. ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते-ते ठिकाण शक्तीपीठ रुपाने प्रसिध्द झाले. या मंदिराचे महत्व म्हणजे या मंदिरामध्ये देवीची मुर्ती नाही. कामाख्या येथे सती देवीच्या योनीचा भाग पडल्याने तेथे योनीभागाची स्थापना करत शक्तीपीठ उदयास आलेले आहे. हे देशातील एकमेव मंदिर असुन देशात इतर कोठेही या देवीचे मंदिर नाही.

मंदिराचे बांधकाम पुर्णत्वाकडे : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पुर्व दिशेला असलेले धारणगांव खडक येथील गणेश महाराज जगताप हे वास्तव्यास आहेत. त्यांना सती देवीने स्वप्नात येवुन दिलेल्या दृष्टांतानंतर धारणगांव खडक येथे कामाख्या देवीच्या मंदिराची निर्मीती होत आहे. निफाड तालुक्यातील धारणगांव खडक येथे मंदिराचे बांधकाम पुर्णत्वाकडे आहे. भव्यदिव्य अशा प्रवेश द्वाराची निर्मीती अंतीम टप्यात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पुर्व बाजुने भव्यदिव्य आणि आकर्षक श्री गणेश मंदिर, पश्चिमेला शिवपार्वती मंदिर तर उत्तर बाजुला धन कुबेर, धनलक्ष्मी व धनदीप या देवतांच्या मंदिरांची निर्मीती करण्यात आलेली आहेत. तसेच मंदिराच्या आग्नेय दिशेला भव्य सप्तशती चंडी हवन बनविण्यात आलेले आहे.

मंदिरावर एकुण २१ कळस : या मंदिरावर एकुण २१ कळस असून त्यापैकी मुख्य तीन कळस असणार आहे. मुख्य पहील्या कळसाखाली सिध्द कामाख्या देवीचे मंदिर साकारण्यात आलेले आहे. सतीमातेच्या योनी भागाची आणि सिध्द दशमहा विद्याच्या मुर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्य दुसऱ्या कळसाखाली सिध्द नवनाथ महाराज, बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर साकारण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये श्री.दत्तात्रेय भगवान, नवनाथ महाराजांच्या नऊ मुर्त्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या कलशाखाली सिध्द सप्तशती तिलस्मी महामाया मंदिरामध्ये इतर ७ देवींच्या मुर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.

मंदिराची उभारणी सुमारे १११ खांबांवर : या मंदिराची उभारणी सुमारे १११ खांबांवर करण्य़ात आलेली आहे. प्रत्येक खांबाच्या चहुबाजुने देव-देविकांच्या मुर्त्यांच्या प्रतिकृती कोरण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे मदिरावरील मुख्य कळसावर बावनबीर देवतांच्या (भगवान शंकर महादेवाचे रुद्र आवतार) मुर्त्यांच्या प्रतिकृती कोरण्यात येणार आहेत. मंदिराच्या आतील बाजुने छताला, भिंतीला रंगबेरंगी विविध आकाराच्या काचेच्या तुकड्यांने सजविण्यात आहे. काचकाम करतांना प्रत्येक स्थापना करण्यात येणाऱ्या देव-देवितांच्या मंत्राचे लिखान आणि यंत्राची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे.

भाविकांच्या निवासाची सुविधा : महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारचे पहिल्या अद्भुत मंदिराची निर्मीती गणेश महाराज जगताप आणि त्यांच्या पत्नी छायाताई जगताप यांच्या अथक प्रयत्नातून साकारण्यात येत आहे. या मंदिराच्या उभारणी करतांना येणाऱ्या भावीकांच्या वाहनाची पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच दैनंदिन पूजा करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची, महाप्रसादाची सुविधा करण्यात येणार आहे.

मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम ११ दिवसांचा : मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेसाठी कामख्या येथील २१ पंडीत, काशी येथील २१ पंडित, त्र्यंबकेश्वर येथील २१ पंडित, नाशिक येथील २१ पंडितांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. अनेक प्रांतातील साधु संत, महंत यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गणेश महाराज जगताप यांनी दिली आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम ११ दिवसांचा आहे. यावेळी अनेक राज्यांतून आणि परगावाहुन उपस्थित राहणाऱ्या भाविक भक्तांच्या निवासाची, महाप्रसादाची सुविधा सिध्द मॉ कामाख्या चॅरिटेबल ट्रस्ट, बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.