ETV Bharat / state

नाशकात पोलीसच असुरक्षित! गुन्हेगारांच्या टोळक्याचा पोलीस पथकावर हल्ला - हल्ला

या घटनेनंतर पोलिसांनी १३ आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन राबवत अटक केली असून यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत.

नाशिक
author img

By

Published : Jun 11, 2019, 8:39 AM IST

नाशिक - गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली. शहरात पोलिसांवरच वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पोलीसच असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर पोलिसांच्या छावण्या उभ्या आहेत. त्याच रात्री शहराच्या मध्यवर्ती भागात एका टोळक्याने गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जबरी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी १३ आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन राबवत अटक केली असून यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी सांगितले.

या हल्ल्यातील जखमी सागर हजारी या पोलीस कर्मचाऱ्याचे वडील, भाऊ, वहिनी असे सर्वच कुटुंब पोलीस खात्यात असून या हल्ल्याच्या घटनेने त्यांचेही मनोबल खचले आहे. टोळक्याच्या हल्ल्यात सागर हजारी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांचे वडील अमरसिंह हजारी यांनी दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी शहरातील पोलीस असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याची भावना नाशिककर व्यक्त करत आहेत.

Intro:गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय आहे शहरात पोलिसांवरच वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरातील पोलिसच सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे

Body:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर पोलिसांच्या छावण्या उभ्या असताना त्याच रात्री नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात एका टोळक्याने गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जबरी हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय आहे या घटनेने नाशिक मध्ये गुन्हेगारीची मुजोरी पुन्हा एकदा समोर आलीय ...
या घटनेनंतर पोलिसांनी 13 आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन राबवत अटक केली असून यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती संजय सांगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगीतले

Conclusion:या हल्ल्यातील जखमी सागर हजारी या पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील भाऊ ,वहिनी असं सर्वच कुटुंब पोलीस खात्यात असून या हल्ल्याच्या घटनेने त्यांचेही मनोबल खचल आहे टोळक्याच्या मारहाणीत सागर हजारी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वडिला अमरसिंह हजारी यानी सागिली

पोलिस कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी शहरातील पोलीस असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच काय असा सवाल उपस्थित केला जातोय गेल्या महिन्या भरात नाशिक मधील वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटनांनी पोलिसांन समोर वाढत्या गुन्हेगारीचे मोठं आव्हान उभं राहिलं त्यामुळे आता तरी नाशिक पोलिसांनी सोशल पोलिसिंग व भर देण्याऐवजी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याची भावना नाशिककर व्यक्त करताय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.