ETV Bharat / state

Underage Pregnant Mothers : धक्कादायक! गेल्या तीन महिन्यात 52 अल्पवयीन गरोदर मातांची नोंद, वाचा सविस्तर

author img

By

Published : Apr 13, 2023, 8:58 PM IST

Updated : Apr 14, 2023, 7:07 PM IST

नाशिक जिल्हा रुग्णालयातील आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यात 52 अल्पवयीन गरोदर मातांची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात 15 फेब्रुवारी 11 तर मार्च महिन्यात तब्बल 26 अल्पवयीन गरोदर मातांचे प्रकरण समोर आले आहे.

Underage Pregnant Mothers
Underage Pregnant Mothers

नाशिक : बालकांच्या हितासाठी लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा करण्यात आला आहे. यासाठी 18 वर्षाखालील मुला मुलींचे संरक्षण व्हावे यासाठी 2012 मध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर्म म्हणजे पोस्को कायदा अस्तित्वात आला. मात्र, असे असतानाही अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय फारसे कमी झालेले नाहीत. अजूनही खेळण्याच्या वयात अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादले जात आहे. अशाच प्रकारच्या घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात उघडकीस आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यातील आकडेवारी बघितली असता एकूण 52 अल्पवयीन गरोदर माता आढळून आल्या आहेत.

महिन्याला पंधरा ते वीस अल्पवयीन प्रसूती : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आदिवासी दुर्गम भागाबरोबरच ग्रामीण शहरी भागही मोठ्या प्रमाणात अवलंबुन आहे. या भागातून अल्पवयीन गरोदर माता रुग्णालयात दाखल होत असतात. सर्वसाधारणपणे महिन्याला किमान 15 ते 20 अल्पवयीन मुली उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती आढळुन आली आहे. याचे प्रमाण कधी कधी 20 च्या पुढे जाते. मार्चमध्ये तर हेच प्रमाण तब्बल 26 इतके होते.

कुटुंबावर होता गुन्हा दाखल : अल्पवयीन मुलीचा विवाह करणे, बाल विवाह लावून देणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारे अल्पवयीन मुलींचे लग्न झाल्याचे आढळून आले तर दोन्ही कुटुंबावर मुला-मुलींचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण 2012 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याने अल्पवयीन गरोदर राहण्याचा प्रकार वाढीस लागले आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊन अनेकदा न कळत्या वयात त्यांना मातृत्व आल्याचे आढळुन आले आहे. मुली अल्पवयीन असल्याने त्यांना गरोदरपणाची पुरेशी माहिती नसल्याने हे प्रकार आढळुन येत आहेत.

बाल कल्याण समितीकडे नोंद : अल्पवयीन मुलींच्या हिताच्या दृष्टीने पीडित मुलींची काळजी, संरक्षणासाठी कायदेशीर दृष्ट्या बालकल्याण समितीकडे अशा प्रकरणाची नोंद केली जाते. समितीच्या निर्णयानुसार मुलीचे आरोग्य संगोपन आणि समुपदेशन बाबत निर्णय घेतला जातो. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा मुलगा हा देखील अल्पवयीन असल्यास त्याला कायद्याने निरीक्षण गृहात ठेवले जाते.

ग्रामीण भागात प्रमाण अधिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा, हरसुल या आदिवासी भागात आजही खेळण्याच्या, शिक्षणाच्या वयात अल्पवयीन मुलाचे विवाह केला जात असल्याचे दिसून येते. मात्र, तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अशा घटना समोर येत नाही. मात्र, विवाहानंतर काही महिन्यांनी अल्पवयीन गरोदर झाल्यावर उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर अशा घटना सामोर येतात.

हेही वाचा - UP Encounters : योगी आदित्यनाथ सरकारच्या कारकिर्दीत सर्वाधिक एनकाउंटर, चकमकीत १७८ जण ठार

Last Updated : Apr 14, 2023, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.