नाशिक - मनमाड-नांदगाव रस्त्यावर ट्रक व दुचाकीमध्ये हिसवळ शिवारात भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दुचाकीवारील आई आणि मुलगी जागीच ठार झाली असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने मालेगाव येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - पैशांच्या वादातून वृद्धाचे मुंबईतून अपहरण, तर गुजरातमध्ये हत्या
नांदगाव येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून निघालेले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत जोया इकबाल खान या मुलीचा तर आई अपसाना इकबाल खान यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक इकबाल खान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून मालेगाव येथे उपचारांसाठी पाठविण्यात आले. खान यांचे नांदगाव येथे मोबाईल विक्रीचे दुकान आहे.
हेही वाचा - मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू