ETV Bharat / state

कौतुकास्पद..! कोरोनामुक्त झालेल्या 82 पोलिसांचा 'प्लाझ्मा' दान करण्याचा निर्णय - मालेगाव कोरोना बातमी

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर रुग्णांच्या उपचारासाठी केला जातो. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कर्तव्यास असताना कोरोना झालेल्या व बऱ्या झालेल्या ग्रामीण पोलीस दलातील सुमारे 82 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Jul 22, 2020, 4:40 PM IST

नाशिक - मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसत आहे. मालेगावात कोरोनाचा कहर सुरू होता, तेव्हा नाशिक ग्रामीणचे पोलीस जीवाची बाजी लावून याठिकाणी कर्तव्य बजावत होते. त्यात अनेकांना कोरोनाची लगाणही झाली व काही कोरोनामुक्तही झाले. आता तेच पोलीस सामाजिक बांधिलकी राखत प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने कहर केला होता. दिवसाला सुमारे 100 हून अधिक बाधितांची भर मालेगावात पडत होती. त्यामुळे या ठिकाणच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाने देखील प्रयत्न सुरू केले होते. यात पोलीस आणि आरोग्य विभाग तर आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र याठिकाणी आपले कर्तव्य बजावत होतो. यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली व बरेही झाले. यात शंभरहून अधिक ग्रामीण पोलिसांचाही समावेश आहे.

राज्यात प्लाझ्मा थेरपीमुळे अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्य शासनाने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर नाशकातील डॉक्टर व पोलिसांनी सामाजिक भार राखत प्लाझ्मा दान करण्यास सुरूवात केली आहे. नाशिक ग्रामीणच्या 82 पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचे वैद्यकीय शिक्षण झाले आहे. या शिक्षणाचा आपल्या पोलीस खात्यामध्ये हा कोरोनासारख्या महामारीत उपयोग केला. प्लाझ्मापासून कशाप्रकारे रुग्ण बरे होतात, हे पटवून सांगितले आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.

‘या’पद्धतीने प्लाझ्मामुळे बरे होतात रुग्ण

आपल्या शरीरामधील रक्ताचे 4 मुख्य घटक लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा हे रक्ताचा द्रव भाग आहे. ह्या प्लाझ्माच्या साहाय्याने, आवश्यकतेनुसार अँटीबॉडीज तयार केलं जातं. कोरोनाच्या आक्रमणानंतर आपलं शरीरं विषाणूंविरुद्ध लढायला सुरुवात करते. प्लाझ्माच्या साहाय्याने तयार अँटीबॉडीज याला लढा देतात. शरीरात पुरेश्या अँटीबॉडीज बनल्या तरच कोरोनाचा नायनाट होऊ शकतो. रुग्ण बरा झाल्यावर हे शरीरातील अँटीबॉडीज प्लाझ्मासह दान करता येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.