नाशिक - जिल्ह्यातील मालेगावसह इतर भागांत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी सकाळी आणखी अहवाल प्राप्त झाले त्यात जिल्ह्यातील 4 जण कोरोना पॉझेटिव्ह आढळून आले आहेत. नाशिक शहरातील समता नगर येथील 1 तर येवल्यातील मौलाना रोड येथील 2 आणि सिन्नर मधील वेदांत पार्क येथील 1 आहे. तर मालेगावची रुग्ण संख्या 416 वर गेली असून जिल्हाची रुग्ण संख्या 506 वर जाऊन पोहचली आहे.
आत्तापर्यंत कोरोनाबाधित पोलीसांचा आकडा 97 वर गेला आहे. तर आरोग्य सेवेतील आत्तापर्यंत 23 जण कोरोनाबाधित झाले आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे देवळालीतील लष्करी हद्दीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथे देखील लष्करी अधिकाऱ्यांसह 8 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे.
सध्याची नाशिक जिल्ह्याची आकडेवारी
- नाशिक शहर 22
- नाशिक ग्रामीण 53
- मालेगाव 416
- बाहेरील इतर जिल्ह्यातील 14
- आत्तापर्यंत जिल्ह्यात मृत्यू 15
कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केल्याने पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील कोरोनाबधितांचा आकडा बघता, सरकारी पातळीवर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.